spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात कायमस्वरुपी ड्रायविंग लायसन्स होणार बंद ? पुणे पोलिसांचा मोठा निर्णय

अनेक प्रकार हे गाडी चालक हा दारू पियून गाडी चालवत असतानाचे आढळून आले. या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आक्रमक भुमिका घेत मोठा निर्णय घेतला आहे. 

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात हिट अॅंड रन चं प्रकरण(Hit and Run case) दिवसेंदिवस पेट घेत असताना दिसत आहे. पुणे सह मुंबईत देखील ड्रिंक अॅड ड्राईव्ह (Drink and drive )चे प्रकरण वाढताना दिसत आहे. या अपघातात निष्पाप जणांचे मृत्यू होत आहेत. यातील अनेक प्रकार हे गाडी चालक हा दारू पियून गाडी चालवत असतानाचे आढळून आले. या प्रकरणांवर आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी आक्रमक भुमिका घेत मोठा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण महिनाभरात पुण्यात १६ हजारापेक्षा अधिक जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जर कोणी व्यक्ती दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे आढळला तर त्याच्यावर खटला दाखल होत होता. मात्र आता दारू पिऊन गाडी चालवताना आढळला तर त्यांचे ड्रायव्हिंग लायसन्स ३ महिने रद्द केले जाईल. त्याचबरोबर त्याच व्यक्तीकडून पुन्हा एकदा गुन्हा घडला तर लायसन्स हे ६ महिन्यांपर्यंत परवाना रद्द केले जाईल. तिसऱ्यांदा तीच चूक त्याच व्यक्तीकडून झाली तर ड्रायव्हिंग लायसन्स कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. असा निर्णय पुणे पोलिस आयुक्त रोहिदास पवार (Rohidas Pawar) यांनी दिला आहे.

 

ज्या पुण्याला विद्येचे माहेर घरं म्हणून ओळखलं जात होतं. तेच पुणे शहर आता ‘उडता पंजाब’ अशी ओळख झाली आहे. शहरात राहण्यासाठी नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. या सुसंस्कृत शहरात नेमकं चाललंय काय असा सवाल नागरिकांडून उपस्थित केला जात आहे. आधी पोर्शे कार प्रकरण आणि त्यानंतर यासारख्या अनेक प्रकरांच्या घटना सुरुच झाल्या.अनेक निष्पापांचे जीव जात असताना आता पोलिसांना देखील दिवसा ढवळ्या मारहाण केल्याच्या घटना या पुणे शहरात होत आहेत. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारी प्रकारानंतर पुणे शहरावर कलंक लागल्याचं दिसत आहे.

हे ही वाचा:

Health is Wealth : आयुर्वेदातील ‘हे’ पदार्थ दुधात मिसळल्यास; आजारांनवर होतो परिणाम !

राजकीय पक्षांनी Reservation बाबत आपली भूमिका लेखी कळवावी, CM Shinde यांचे आवाहन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss