PM Narendra Modi यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन, असे असणार मेट्रोमार्गाचे तिकीट दर

PM Narendra Modi यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन, असे असणार मेट्रोमार्गाचे तिकीट दर

Pune Metro: अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला जिल्हा न्यायालय ते स्वारगेट हा पुण्यातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग आज (रविवार, २९ सप्टेंबर) अखेर प्रवाशांसाठी खुला झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गाचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेदेखील उपस्थित होते. आजपासून हा मार्ग सार्वसामान्य प्रावाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पदधतीने उदघाटन करून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. आज संध्याकाळी ४ वाजेपासून हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रोमार्गावर जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई आणि स्वारगेट अशी चार मेट्रो स्थानके आहेत.

असे असणार मेट्रोमार्गाचे तिकीट दर

जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ – १० रुपये

जिल्हा न्यायालय ते मंडई – १५ रुपये

जिल्हा न्यायालय ते स्वारगेट – १५ रुपये

स्वारगेट ते मंडई – १० रुपये

स्वारगेट ते कसबा पेठ – १५ रुपये

स्वारगेट ते जिल्हा न्यायालय – १५ रुपये

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पुण्यात मेट्रो सुरु करण्याचा निर्णय २००८ मध्ये झाला होता. परंतु काम २०१६ मध्ये सुरु झाले. आमचे सरकार २०१४ मध्ये आला. त्यानंतर या प्रकल्पाच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये मेट्रोची कामे सुरु झाली. आता पुणे मेट्रोचे घौडदौड सुरु आहे. २०१६ पासून आतापर्यंत पुणे मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जुना विचार आणि कार्यपद्धती असती तर एकाही कामे पूर्ण झाली नाही.

“पुण्यात मेट्रो सुरु करण्याचा निर्णय २००८ मध्ये झाला होता. परंतु काम २०१६ मध्ये सुरु झाले. आमचे सरकार २०१४ मध्ये आला. त्यानंतर या प्रकल्पाच्या मार्गात असलेल्या अडचणी दूर केल्या. त्यानंतर २०१६ मध्ये मेट्रोची कामे सुरु झाली. आता पुणे मेट्रोचे घौडदौड सुरु आहे. २०१६ पासून आतापर्यंत पुणे मेट्रोचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. जुना विचार आणि कार्यपद्धती असती तर एकाही कामे पूर्ण झाली नाही,” असे ते यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

सिनेट निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही असाच विजय मिळवायचा आहे: Aaditya Thackeray

संविधानावरचा धोका अद्याप टळला नाही हे Prakash Ambedkar यांना सांगायची गरज नाही: Sanjay Raut

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version