spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune Monsoon Updates: दुर्घटना टाळण्यासाठी स्वत:सह कुटुंबाची काळजी घ्या, Ajit Pawar यांचे नागरिकांना आवाहन

प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्याकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना, आवाहनांचे पालन करावे. राज्यातील अनेक भागात अतिवृष्टी होत असल्याने नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नदीनालेओढे. धरणपूरस्थिती असलेल्या सखल भागात जाणे टाळावे. डोंगरटेकड्यादऱ्याधबधब्यांसारख्या ठिकाणी पुराचे पाणी अचानक वाढणेनिसरड्या वाटेवर पाय घसरुन अपघात होण्यासारख्या दुर्घटना टाळण्यासाठी सद्यंस्थितीत पर्यटनासाठी बाहेर पडू नये. दरडप्रवणपूरग्रस्तसखल भागातील नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षितस्थळी आसरा घ्यावा. स्वत:सह कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावीअसे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. 

खडकवासला धरणाची क्षमता पावणे तीन टीएमसी एवढी आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे खडकवासला धरण अगोदरच ५० टक्के भरले होते. त्यातच काल दिवसभर आणि रात्री खडकवासला धरणाच्यावरच्या क्षेत्रात ८ इंच आणि पाणलोट क्षेत्रात ५ इंच पाऊस पडला आहे. साधारण ७५ टक्के धरण भरल्यानंतर त्यातून पाणी सोडले जाते. मात्र, धरणाच्यावरच्या भागातून तीन टीएमसीपेक्षा जास्त पाणी धरणात आले आहे. त्यामुळे खडकवासल्याच्या बाबतीत पाणी सोडण्याची संधी मिळाली नाही. झोपेत असलेल्या नागरिकांना त्रास होऊ नये, नागरिकांची सोय आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने खडकवासला धरणाचे पाणी रात्री सोडण्याऐवजी पहाटे सोडण्यात आले, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. पुणे शहर आणि जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर  उपमुख्यमंत्री जिल्ह्यात उपस्थित राहून बचाव आणि मदतकार्याचे नेतृत्व करणार आहेत. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरासह पाऊस जास्त असणाऱ्या भोर, वेल्हा, मुळशी भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील वरसगाव, टेमघर, खडकवासला, पानशेत या धरणात यापूर्वी पाणी कमी असल्यामुळे शहराला काही काळ पुरेल एवढाच पाणीसाठा होता. त्यामुळे त्यातून पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. आता या धरण क्षेत्रामध्येही पावसाचे प्रमाण जास्त आहे. त्यातूनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. मुळशी परिसरात दरड कोसळली आहे, तर काही भागात जीवित हानी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पूरपरिस्थिती आणि बचावकार्याविषयी माहिती देताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, खडकवासला परिसराबरोबच पुणे परिसरात पावसाचे प्रमाण जास्त होते. पुणे शहर परिसरात डांबरी रस्ते, क्राँक्रिटीकरण मोठ्या प्रमाणात झाले आहे. वन विभागाच्या जमिनी, टेकड्या, शासकीय इमारतींचा परिसर सोडला तर इतर ठिकाणी मोकळ्या जागा कमी आहेत. या पार्श्वभूमीवर दोन-तीन दिवस पाऊस पडत असल्याने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी झाली होते. शहरातून वाहणाऱ्या नद्यांची पाणी वहन क्षमता ठरलेली आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून नदीकाठावरील काही परिसरात, नगररोड, एकतानगर यासारख्या सखल भागात पाणी साचले आहे. या भागातील इमारतींमध्ये, वाहनतळ परिसरात, वाहनांमध्ये पाणी शिरले आहे. इमारतीच्या वरच्या भागात नागरीक सुरक्षित आहेत, त्यांना खाली येण्याचे आवाहन करून सुरक्षितस्थळी नेण्यात येत आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवसांचे अंदाज वर्तवले आहेत. त्यानुसार काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर काहींना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व यंत्रणा अलर्ट करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास संबंधित ठिकाणी मदत व बचावकार्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करण्यात आली आहे. मुंबईतील कुर्ला व घाटकोपर, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली अशा जिल्ह्यांमध्ये एकूण १८ ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथके, तसेच ६ राज्य आपत्ती निवारण पथके तैनात करण्यात आली आहेत, अशी माहितीही उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली.

हे ही वाचा:

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Olympics 2024 : भारताने उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेशन, महिलांनी दमदार कामगिरीने जिंकली मनं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss