spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

PUNE: नेट परीक्षेचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ तारखेला होणार परीक्षा

जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेटची परीक्षा ६ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. सदर परीक्षा ऑनलाईन होणार असून दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. 

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (UGC) वतीने घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता चाचणी (NATIONAL ELIGIBILITY TEST) अर्थात युजीसी नेटचे (UGC NET) सविस्तर वेळापत्रक (TIMETABLE) प्रसिद्ध जाहीर करण्यात आले आहेत. प्रत्येक वर्षात दोनवेळा घेण्यात येणाऱ्या नेटच्या परीक्षेचे वेळापत्रक आता विद्यार्थ्यांसाठी जाहीर केल्यामुळे परीक्षाधारकांना अभ्यासाचे नियोजन करता येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) मार्फत ६ ते १४ डिसेंबर या कालावधीमध्ये नेटची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. यापूर्वी जून २०२३ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. ३१ ऑक्टोबरपर्यंत नेट परीक्षेचे फॉर्म्स भरता येणार होते. या कालावधीत ज्या व्यक्तींनी हे फॉर्म्स भरले, त्यांची परीक्षा ६ ते १४ डिसेंबर या कालावधीमध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात येणार आहे.

महाविद्यालयात शिकवण्यासाठी शिक्षक होण्यासाठी देशभरात नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नेटची परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून परीक्षेसाठी केंद्र निश्चित केलेल्या शहरांची माहिती परीक्षेच्या १० दिवस आधी दिली जाते.  www.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. उमेदवारांनी परीक्षेविषयी अधिकृत माहितीसाठी वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेटची परीक्षा ६ डिसेंबर पासून सुरु होणार आहे. सदर परीक्षा ऑनलाईन होणार असून दोन सत्रांमध्ये घेतली जाणार आहे. पहिल्या सत्रात इंग्रजी (ENGLISH), हिंदू स्टडीज (HINDU STUDIES), कोकणी (KONKANI) व इतर काही परकीय भाषांची परीक्षा असणार  आहे. तर दुसऱ्या सत्रात इतिहास (HISTORY), मणिपुरी (MANIPURI), जर्मन (GERMAN), सिंधी (SINDHI) या विषयांच्या परीक्षा असतील. वाणिज्य विषयाची (COMMERCE) परीक्षा ७  डिसेंबरला पहिल्या सत्रात तर शारीरिक शिक्षण (PERSONAL TRANING), भारतीय संस्कृती (INDIAN CULTURE), संगीत (MUSIC), फ्रेंच (FRENCH), संगणकशास्त्र (COMPUTER STUDIES) आदी विषयांच्या परीक्षा दुसऱ्या सत्रात नियोजित करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे दररोज दोन सत्रांमध्ये विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

हे ही वाचा : 

मालिकेत येणार मोठा ट्विस्ट;मधूभाऊंची  सुभेदारांच्या घरात होणार एन्ट्री!

Maharashtra: ते बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, संजय राऊतांची आक्रमक भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss