spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

हे कायद्याचं राज्य आहे, कोयत्याच नाही!, भाजपने केली जोरदार पोस्टरबाजी

पुण्यात कोयता गॅंगच्या गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढत चाललं आहे. त्यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. काही दिवसांपूर्वी कोयता गॅंगचा प्रमुख बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना पोलिसांनी अटक केली होती.

Pune Crime News : पुण्यात कोयता गॅंगच्या गुन्हेगारीचे प्रमाण हे वाढत चाललं आहे. त्यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी कारवाई देखील केली आहे. काही दिवसांपूर्वी कोयता गॅंगचा प्रमुख बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना पोलिसांनी अटक केली होती. पुण्यातील पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना पकडलं होत. यासंदर्भात भारतीय जनता पार्टीने पोस्टरबाजी केली आहे. त्यात देवेंद्र फडणीसांचा (Devendra fadanvis) फोटो लावण्यात आला आहे. या पोस्टरची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

कोयता गॅंग संदर्भात भारतीय जनता पार्टीने जोरदार पोस्टरबाजी केली आहे. यासंर्भात फेसबुक पेजवर बीजेपी महाराष्ट्र यावरून पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या [पोस्टरवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावण्यात आला आहे. आणि त्यात पोस्टर मध्ये लिहिण्यात आलं आहे कि, हे कायद्याचं राज्य आहे, कोयत्याच नाही! पुण्यात यशस्वी कोम्बिंग ऑपरेशन असं त्या पोस्टरमध्ये म्हंटल आहे. तसेच दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या धुमाकुळानंतर ३,७६५ गुन्हेगारांची झाडाझडती. पिस्तुलासह १४५ कोयते जप्त! असं लिजील आहे आणि त्याचसोबत देवा भाऊंच्या राज्यात गँग कोणतीही असो, मुसक्या आवळल्या जातील! असं देखील फेसबुक मार्फत शेअर करण्यात आल्याला पोस्टरमध्ये म्हंटल आहे.

पुणे पोलिसांची कोयता गंगवार मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये समिर लियाकत पठाण (वय- २६ हडपसर, पुणे), शोएब लियाकत पठाण (वय २०, हडपसर पुणे) , गणेश ऊर्फ दादा विठ्ठल हवालदार, (वय २२ मांजरी, पुणे, प्रतिक ऊर्फ एस के हनुमत कांबळे (वय २० मांजरी, पुणे), गितेश दशरथ सोलनकर (वय २१ हडपसर पुणे), ऋतिक संतोष जाधव, (वय- १९ मांजरी, पुणे ), साई राजेंद्र कांबळे, (वय-२० मांजरी, पुणे), ऋषिकेश ऊर्फ सोन्या संजय पखाले (वय २४ मांजरी, पुणे) , ऋतिक सुनिल मांढरे, (वय २२ मांजरी रोड,हडपसर पुणे १० ), प्रतिक शिवकुमार सलगर, (वय १९ मांजरी, पुणे) तसेच इतर आरोपी अल्पवयीन आहेत.

पुण्यातील पोलिसांनी (Pune Police) कोंबिंग ऑपरेशन करत ही सर्व कारवाई केली. कोम्बिंग ऑपरेशनच्या पहिल्या रात्री धाडसत्र सुरु केलं होतं. पोलिसांनी (Pune Police) कोंबिंग ऑपरेशन राबवलं. आणि पुणे शहरातील ३,७६५ गुन्हेगारांची चौकशी केली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. तपासात ६९८ गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झालं. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, १४५ कोयते जप्त करण्यात आले. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला होता. शहरातील विविध भागात त्यांनी दहशत निर्माण केली होती.

हे ही वाचा:

सरकारमध्ये निवडणुका लावण्याची हिंमत नाही, आदित्य ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लबोल

IND vs SL तिरुवनंतपुरममध्ये भारत आणि श्रीलंका तिस-या वनडेत भिडणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार थेट सामना

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss