पुणे पोलिसांनी लढवली अनोखी युक्ती, कोयता बाळगणार्‍याला पकडा अन् …

पुणे पोलिसांनी लढवली अनोखी युक्ती, कोयता बाळगणार्‍याला पकडा अन् …

सध्या गुन्हेगारीचे माहेर घर असणाऱ्या पुण्यामध्ये (Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालली आहे. पुण्यातून रोज काहींना काही गुणाचं घडल्याची माहिती समोर येते. तेवढेच नाही तर या गुन्हेगारांनी पुणे पोलिसांवर देखिल हात उचलला आहे. एवढाच नाही तर पोलिसांवर गोळीबार (Firing) केल्याची माहिती देखील समोर आली आहे. तर आता पुणे पोलिसांनी गुन्हेगारीला आलं घालण्यासाठी अनोखी युक्ती लढवली आहे. पुणे पोलिसांनी नागरिकांनी आव्हान केले आहे की, “कोयता बाळगणार्‍याला पकडा आणि बक्षीस मिळवा”, असं म्हणत पुणे पोलिसांनी जाहीर केलं आहे. अशा प्रकारे लवकरात लवकर पुण्यामढील गुन्हेगारीला आलं बसू शकतो. तर पोलिसांनी यावर अजून एक युक्ती लढवली आहे.

एके काळी आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे या शहराला गुन्हेगारीचे महेर घर म्हणून ओळखले जाण्यास सुरुवात झाली आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहरात कोयता गॅंग (Koyta gang) म्हणून ओळख असलेल्या एका टोळीने पुणे शहरात दहशद निर्माण करून ठेवली आहे. त्यामुळे ही टोळी कोयत्याने नागरिकांवर हल्ला करते अलीकडेच पुण्यातील एका शाळेतील विद्यार्थावर देखील या टोळीकडून हल्ला करण्यात आला आहे. तसेच कोयता गॅंग ही रोज पुण्यातिल नव्या परिसरात धुमाकूळ घातलाना दिसत आहे. आणि अनेक वेळा गोळीबार झाल्याची घटना देखील पुण्यात घडली आहे. यांच्यामुळे पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. शिवाय यापूर्वी या कोयता गॅंगनं अनेक व्यापाऱ्यांचं नुकसानदेखील केलं आहे. त्यामुळे या सगळ्यांना जेरबंद करण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. त्यासाठीच पुणे पोलिसांनी ही युक्ती काढली आहे.

पोलिसांनी नागरिकांसह पोलीस दलातील देखील अधिकाऱ्यांसाठी यि योजना आखली आहे. या योजनेनुसार पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार रुपये आणि कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे. वाँटेड, फरार आरोपींना पकडल्यास देखील हजारो रुपयांची बक्षीसं जाहीर करण्यात येणार असून पुणे पोलिसांच्या या बक्षीस योजनेची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

हे ही वाचा:

Maharashtra MLC Election Results 2023 Live Update, कौल कुणाला? जाणून घ्या प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

फोन टॅपिंगच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा मोठा निर्णय, नेते-पदाधिकाऱ्यांना दिले iPhone वापरण्याचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version