Pune : पुण्यातून धक्कादायक बातमी ,चक्क १०० रुपयांसाठी विद्यार्थ्याचा कापला हात

Pune : पुण्यातून धक्कादायक बातमी ,चक्क  १०० रुपयांसाठी  विद्यार्थ्याचा कापला हात

पुणे हे गुन्हेगारीचं माहेरघरच बनले आहे, हे म्हणायला काही हरकत नाही. कारण पुण्यातून अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे . चक्क १०० रुपयांसाठी चार तरुणांनी एका तरुणाचा हात कापला असल्याची घटना काल रात्री पुण्यात घडली आहे. ३१ डिसेंबरला म्हणजेच काल रात्री एक वाजताच्या सुमारास पुण्यातील चार तरुणांनी मिळून शंभर रुपयांसाठी एका तरुणाचा हात मनगटापासून कापला आहे. सुदैवाने पोलिसांच्या लक्षात आले आणि पोलिसांच्या घटनस्थिती पोहोचले त्यामुळे पीडित मुलाचा जीव वाचला आहे.

या आधीही पुण्यातुन अनेक गुन्हेगारीच्या घटना समोर आल्या आहेत.अलीकडे काही आरोपींनी थेट पुणे पोलिसांवर हात उचलल्याची घटना देखील समोर आली होती. पण आता तर पुण्यातील तरुण सुद्धा गुन्हेगारीकडे वळले असल्याचे दिसत आहे. ३१ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच काल रात्री एकच्या सुमारास पुण्यातील पाषाण परिसरात चार तरुणांनी एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आणि त्या तरुणाचा हात मनगटापासून कापला. पोलिसांनी लगेच कारवाई केली. हल्लेखोरांपैकी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुकलगा हा गेल्या दोन महिन्यांपासून त्याच्या तीन मित्रांसोबत राहत होता. नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने पीडित मुलगा आणि त्याचे तीन मित्र हे चौघेही तरुण जेवणासाठी पुण्यातील साई चौकातील हॉटेलमध्ये गेले होते. जेवण झाल्यानंतर हॉटेलच्या बाहेर आले तेव्हा दुचाकीवरुन दोन अनोळखी मुलं पीडित मुलगा आणि त्याच्या मित्रांकडे आले आणि त्यांनी पीडित मुलाला १०० रुपयांची मागणी केली. पीडित मुलाने त्यावर नकार दिला. मग दुचाकीस्वार असलेल्या मुलाने त्याच्या मित्रांना घटनास्थळी बोलवलं आणि पीडित मुलाचा हात मनगटापासून धार धार शस्त्रांनी कापला. घटनास्थळी उपस्थित असेलेल्यानी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलीसना माहिती मिळताच पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली. त्यामुळे पीडित मुलाचा जीव वाचला. हल्लेखोरांमधील दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणखी दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आल्याचे कळले आहे. पण या सम्पूर्ण घटने नंतर पुण्यात सगळीकडे भीतीचा वातावरण पसरलं आहे.

हे ही वाचा:

Exclusive : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? पंडित राजकुमार शर्मा म्हणाले…

जॉर्जिया एंड्रियानीचा बोल्ड लुक , पहा तिचा अनोखा अंदाज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version