spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Pune Zika Virus : पुण्यात Zika ची चिंता वाढली, दोघांचा मृत्यू तर रुग्णसंख्येत वाढ, काय काळजी घ्यायची?

पुण्यात झिका व्हायरसची लागण झालेल्या दोन ज्येष्ठ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामुळे पुन्हा एकदा झिकाबाबत चिंता वाढली आहे. रविवार दिनांक 28 जुलै रोजी पुण्यात झिकाचे आठ रुपये आढळले. त्यामुळे आता शहरातील एकूण रुग्ण संख्या 45 इतकी झाली आहे. झिका विषाणूची लागण झालेल्या दोन्ही ज्येष्ठ नागरिकांना हृदय आणि यकृताचा आजार होता. त्यामुळे या दोघांचा मृत्यू झिकामुळे झाला किंवा इतर कारणांमुळे झाला याची तपासणी आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुढील माहितीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीला पत्र सुद्धा लिहिलं आहे. मृत्यू झालेल्या वृद्ध व्यक्तींचे वय 71 पेक्षा जास्त होते. यापैकी एका रुग्णाला सह्याद्री रुग्णालयात तर दुसऱ्या रुग्णाला वारजे येथील जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जोशी रुग्णालयात 14 जुलै रोजी हाय ब्लडप्रेशरसह आरोग्य विषयक समस्यांमुळे रुग्णाचा मृत्यू झाला. तर 19 जुलै रोजी झिका विषाणूचे निदान स्पष्ट झाले होते. खराडी येथील रुग्णाचे अनेक अवयव निकामी झाल्याने सह्याद्री रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते, पण 21 जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. रविवारी 28 जुलै रोजी शहरात नोंद केलेल्या आठ नवीन रुग्णांमध्ये दहा वर्षांच्या मुलाचा सुद्धा समावेश आहे.

झिका (Zika) हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. झिका विषाणू हा मुख्यत्: एडीस डासांद्वारे प्रसारीत होणाऱ्या विषाणूमुळे होतो. हा डास दिवसा चावत असतो. या विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असून एकात्मिक किटक व्यवस्थापन अंतर्गत एडीस डास प्रतिबंधात्मक उपाय योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये जलद ताप सर्वेक्षण मोहिमेतंर्गत रूग्णाच्या ३ ते ५ किलोमीटर भागामध्ये सर्वेक्षण करून रक्तजल नमुन्यांचे संकलन करण्यात येत आहे. गर्भवती महिलांचे रक्तजल नमुन्यांचे संकलन व तपासणी, सर्व रूग्णांना लक्षणांवर आधारीत उपचार, गर्भवती महिला व जननक्षम जोडप्यांना या आराजारातील धोक्यांबाबत मार्गदर्शन, एडीस डासांच्या प्रतिबंधासाठी प्रभावी किटक शास्त्रीय उपाय योजना करण्यात येत आहे.

Zika विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी काय करायचे? 

गावातील सर्व पाणी साठे वाहते करण्यात यावेत. पाण्याची भांडी कापडाने झाकून घ्यावीत, जे घरातील पाणीसाठे रिकामे करता येत नाही, त्यामध्ये गप्पीमासे किंवा टेमिफोस या अळीनाशकांचा वापर करावा. निरूपयोगी टायर नष्ट करावे, रात्री तसेच दुपारी झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. दिवसा पूर्ण कपड्यांमध्ये रहावे. कोणत्याही परिस्थितीत डासांसाठी पोषक वातावरण निर्माण होऊ देऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

Virar मधील धक्कादायक बातमी, Shivsena UBT ठाण्याचे उपशहर प्रमुख Milind More यांचे निधन, हल्लेखोर पसार

Health Tips : लठ्ठपणा एक रोग ; देतो अनेक आजारांना आमंत्रण

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss