Pune Zika Virus : पुण्यात झिका विषाणूचं थैमान, ६ जणांसह २ गर्भवती महिलांना लागण

महाराष्ट्रातील पुणे शहरात झिका विषाणूचे तब्बल ६ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.

Pune Zika Virus : पुण्यात झिका विषाणूचं थैमान, ६ जणांसह २ गर्भवती महिलांना लागण

Pune Zika Virus Cases: महाराष्ट्रातील पुणे शहरात झिका विषाणूचे तब्बल ६ रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये दोन गर्भवती महिलांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे. एरंडवणे परिसरातील २८ वर्षीय गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले. आता गेल्या शुक्रवारी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर सोमवारी आणखी एका गर्भवती महिलेला संसर्ग झाल्याचे निदान झाले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही महिलांची प्रकृती ठीक असून त्यांना कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. गर्भवती महिलांमध्ये, झिका विषाणूमुळे गर्भामध्ये मायक्रोसेफली (असा स्थिती ज्यामध्ये मेंदूच्या असामान्य विकासामुळे डोके खूपच लहान होते) होऊ शकते. झिका विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण एरंडवणे येथे आढळून आला, जेव्हा ४६ वर्षीय डॉक्टरचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीचा नमुनाही पॉझिटिव्ह आला. अधिकाऱ्याने सांगितले की, मुंढवा येथेही ४७ वर्षीय महिला आणि २२ वर्षीय पुरुषाला झिका व्हायरसची लागण झाली आहे. झिका विषाणू रोग संक्रमित एडिस डासाच्या चाव्याव्दारे पसरतो, जो डेंग्यू आणि चिकुनगुनिया सारख्या संसर्गाचा प्रसार करण्यासाठी देखील ओळखला जातो. १९४७ मध्ये युगांडामध्ये हा विषाणू पहिल्यांदा ओळखला गेला. पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. ते म्हणाले की, खबरदारीचा उपाय म्हणून डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी फॉगिंग, फ्युमिगेशन यासारख्या उपाययोजना केल्या जात आहेत.

झिका विषाणूची लक्षणे:
सामान्यत: झिका विषाणूची लागण झालेल्या ८० टक्के लोकांमध्ये कोणताही संसर्ग दिसून येत नाही, परंतु जर एखाद्याला ताप, पुरळ, सांधे व स्नायू दुखणे, डोकेदुखी किंवा डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे संक्रमित डास चावल्यानंतर एक आठवड्यानंतर दिसतात आणि सुमारे एक आठवडा टिकू शकतात.

हे ही वाचा:

‘तुमच्या खुर्चीवर दोन लोक बसलेत…’ Rahul Gandhi यांची लोकसभा अध्यक्ष Om Birla यांच्यावर टीका

राहुल गांधींनी संसदेत भगवान शिवाचा फोटो का दाखवला?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version