spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यात पावसाचा हाहाकार! सिंहगड परिसरात छातीपर्यंत पाणी, तर रेस्क्यू बोटीद्वारे बचावकार्य सुरू

राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे.

Pune Rain Update : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाचा जोर राज्यात अजूनही कायम आहे. पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या पुण्यात पावसाची (Pune Rain) तुफान बॅटिंग सुरु आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं आहे. दरम्यान, आज देखील पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आज पुण्यात पावसाचा रेड अलर्ट (Red Alert) जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील पुणे, सातारा, रायगड, पालघर, सांगली या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज आणि यलो अलर्ट आहे. पुणे, सांगलीत पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन गुरुवारी सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. पुण्यात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी हे आदेश काढले आहेत. पुण्यातील अनेक भागांत अक्षरश: छातीपर्यंत पाणी भरलं आहे. सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. तर सिंहगड परिसरामध्ये अनेक लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे.

तर खडकवासला धरणातून ४०,००० क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने मुठा नदीला पूर (Pune Heavy Rain) आला आहे. त्यामुळे पुणे शहरातील डेक्कन, सिंहगड रोड, एकता नगर, पूलाची वाडी या सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. पूलाची वाडी आणि एकता नगर परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाळी आहे. मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) ५ सोसायट्यांमध्ये पाणी घुसलं आहे. एकता नगर परिसरातील द्वारका, जलपूजन, शारदा सरोवर, शाम सुंदर या सोसायट्या पाण्याखाली गेल्या आहेत. नागरिकांच्या घरात पाणी घुसलं असून घरातील सर्व सामान पाण्याखाली गेलं आहे. घरात पाणी घुसून गाद्या भिजल्या आहेत, तर अनेक सामान पाण्यासोबत वाहून गेलं आहे. नागरिकांना सुखरुप घरातून बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू बोटी दाखल झाल्या आहेत. पुणे शहराच्या सखल भागात प्रचंड पाणी साचलं आहे. सोसायट्यांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी भरलं आहे.

तर मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) अनेक भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. पुण्यातील एकता नगर परिसरात ठातीपर्यंत पाणी साचलं आहे. पुण्यात एकता नगर परिसरात बोटीद्वारे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. परिसरात पाण्याची पातळी वाढत चालली आहे. पाण्याचा प्रवाह वाढल्याने बोटीद्वारे बचावकार्य करण्याच्या प्रयत्नात अडथळे निर्माण झाले आहेत. शेकडो लोक एकता नगर भागात अडकले आहेत. पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहे. अडकलेल्या नागरिकांच्या बचावासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

पिंपरी चिंचवड शहराची आणि मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरण परिसरात रात्रीत रेकॉर्ड ब्रेक पाऊस कोसळला आहे.गेल्या १२ तासांत तब्बल ३७४ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाने तुफान बॅटिंग केल्याने धरणाच्या पाणी साठ्यात १२ तासांमध्ये थेट १० टक्के वाढ झाली आहे. बुधवारी सायंकाळी ५ वाजता धरणाचा पाणी साठा ५७.७० टक्के इतका होता, तो आता ६७.८० टक्के झाला आहे. गेली अनेक वर्षे एका रात्रीत इतका तुफान पाऊस बरसल्याची नोंद नव्हती.

पुणे धरणसाठा

खडकवासला १०० टक्के
टेमघर ५७ टक्के
वरसगाव ६३ टक्के
पानशेत ७६ टक्के

 

हे ही वाचा:

SANKASHTI CHATURTHI 2024: जाणूयात संकष्टी चतुर्थी विषयीची महती ; उपवास कसा करावा ते उपवास कसा सोडावा..

MCA ELECTION : अजिंक्य नाईक ठरले MCA च्या नव्या अध्यक्षपदाच्या विजयाचे मानकरी..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss