पुण्यात राज ठाकरेंना बसला मोठा धक्का!

पुण्यात राज ठाकरेंना बसला मोठा धक्का!

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठकरे हे पक्ष बांधणीसाठी महाराष्ट्र पिंजून काढता आणि दुसरीकडे राज ठाकरे यांना पुण्यात मोठा धक्का बसला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray ) कोकण दौऱ्यावर असताना पुण्यात (Pune) मनसेला मोठं खिंडार पडलं आहे. मनसेचे पुणे (MNS) माथाडी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष पदावरुन नीलेश माझिरे (Nilesh Mazire) यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासह ४०० पदाधिकारी आणि सदस्यांनी मनसेला राम राम ठोकला आहे. या सगळ्यांच्या राजीनाम्यामुळे (resignation) पुण्यात मनसे खिळखिळी होण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून पुण्यातील मनसेच्या नेत्यांमध्ये असलेले अनेक अंतर्गत वाद (dispute) चव्हाट्यावर आले आहेत. अनेकांनी त्यांचं मत उघडपणे स्पष्ट केलं नसलं तरीही कार्यकर्त्यांमध्ये खदखद बघायला मिळत आहे. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने नीलेश माझिरे यांची कामगार आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबतच त्यांच्या तब्बल ४०० सदस्यांनीदेखील मनसेचा राजीनामा दिला आहे.

नीलेश माझिरे यांचा ग्रामीण परिसरात मोठा जनसंपर्क असल्याने ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी सदस्याची नोंदणी केली होती. त्यातील तरुणांची संख्या मोठी होती. मात्र आपल्याच नेत्याची पदावरुन हकालपट्टी केल्याने सदस्यही आक्रमक झाले आहेत. आतापर्यंत ४०० सदस्यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. शनिवारी नीलेश माझिरे यांची हकालपट्टी झाली होती. त्यानंतर रविवारी एका दिवसात ४०० जणांनी राजीनामा दिला मात्र ज्या वेगात ही माहिती अनेक सदस्यांपर्यंत पोहोचेल त्या वेगात राजीनामे दिले जातील, असा विश्वास नीलेश माझिरे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर तरुण सदस्यांनी राजीनामे देणं, मनसेला चांगलंच महागात पडणार असल्याचं सुद्धा बोललं जात आहे.

हे ही वाचा : 

‘वेड’ सिनेमातील ‘बेसुरी’ गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीस

सोनाली कुलकर्णीचे लंडन मधील काही खास फोटो

उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची अखेर झाली भेट

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version