राज ठाकरे यांचा पुणे दौऱ्यावर,अनोखा उपक्रम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर गेले आहेत. आज त्यांनी पुण्यात गणपती मूर्तीचं वाटप केलं.

राज ठाकरे यांचा पुणे दौऱ्यावर,अनोखा उपक्रम

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) आज पुणे दौऱ्यावर गेले आहेत. आज त्यांनी पुण्यात गणपती मूर्तीचं वाटप केलं. यंदा या उपकारांतर्गत ते ७ हजार ५०० गणेश मुर्त्या वाटप करणार आहेत. मागील तीन वर्षांपासून गणेशोत्सवाच्या पूर्वी गणपती मूर्तींचं वाटप करण्यात येते. या उपक्रमाअंतर्गत राज ठाकरे यांनी पाच मुर्त्यांचे वाटप केले आहे. सध्या सगळीकडे छान रंग केलेल्या मुर्त्या पाहायला मिळत आहेत. पण या मुर्त्यांची किंमत काहींना परवडणारी नसते. लहान मुलांनाचा देखील हा हट्ट असतो त्यांना मोठ्या मुर्त्या हव्या आहेत. पुण्यातील प्रल्हाद गवळी मित्र परिवारातर्फे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.

मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवार पेठेत हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाची सुरुवात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी गणरायाची आरती करून मूर्ती वाटपास सुरुवात केली आहे. त्याच्या हस्ते पाच नागरिकांना मूर्तीचे वाटप करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी ७ हजार ५०० मुर्त्या वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या असून नागरिकांनी मूर्ती ठरवून रक्कम जमा करायची आहे. साईनाथ चकोर, हेमंत कंठाळे, नरेश देवकर, जीवन गायकवाड, विक्रम लगड, गौरव गवळी, भाई कात्रे, श्रीराज पवार, विकास गवळी यांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

कोरोना काळापासून ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ हा उपक्रम मनसे कडून राबवण्यात येतो. यावर्षी या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. पुण्यातील नागरिकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आहे. गणपतीच्या मुर्त्यांची किंमत वाढल्यामुळे काहीवेळा काही कुटूंबाना मूर्ती घेणं शक्य होत नाही त्यामुळे ‘मूर्ती आमची किंमत तुमची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कोणाकडे पैसे नसतील तर विनामूल्य मूर्ती देखील देण्यात येते, असं हा उपक्रम सुरु करणारे प्रल्हाद गवळी यांनी सांगितलं.लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस सैनिकी शाळेच्या 101 विद्यार्थ्यांनी राज ठाकरे यांचे लाईव्ह चित्र यावेळी काढले.

हे ही वाचा: 

सूरज पांचोली गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये

कोकणातील शेतकऱ्याची अनोखी कमाल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version