Saturday, July 6, 2024

Latest Posts

ट्रॅफिकमुळे पुण्यातून आयटी कंपन्या स्थलांतरित, Ravindra Dhangekar यांची X पोस्ट चर्चेत

पुण्यातून अतिशय धक्कादायक बातमी येत असून वाढत्या ट्राफिक जामच्या समस्येमुळे हिंजवडी येथील तब्बल ३७ कंपन्या या महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होत आहेत.

वाढत्या शहरीकरणामुळे तसेच लोकसंख्येच्या वाढत्या ताणामुळे पुणेकरांना ट्राफिकचा त्रास आता जास्तच जाणवू लागला आहे. अश्यातच आता पुण्यातून अतिशय धक्कादायक बातमी येत असून वाढत्या ट्राफिक जामच्या समस्येमुळे हिंजवडी येथील तब्बल ३७ कंपन्या या महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित होत आहेत. आधीच बेरोजगारीमुळे त्रस्त असलेल्या मराठी तरुणांसाठी ही मोठी धक्कादायक बाब असून आधीच महाराष्ट्रातून उद्योगधंदे इतर राज्यात स्थलांतरित होत असतानाच आता वाहतूक कोंडीमुळेदेखील उद्योग राज्याबाहेर जात आहेत.

यावरून काँग्रेसचे पुण्याचे आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhngekar) यांनी आपल्या अधिकृत ‘X’ हॅण्डलवरून याबाबत पोस्ट करत चिंता व्यक्त केली आहे. यावारून राज्य सरकारवर टीका करत ते म्हणाले, “राज्य सरकार पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आता ट्राफिक जामच्या कारणामुळे ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात,” असे ते म्हणाले.

रवींद्र धंगेकर आपल्या ‘X’ अकाऊंटवरून म्हणाले, “हिंजवडी आयटी पार्क मधून तब्बल ३७ कंपन्या बाहेर गेल्या असल्याची बातमी आपलं टेन्शन वाढवणारी आहे. एक तर सरकार आपल्या पुण्यात नवा रोजगार आणण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. आता ज्या कंपन्या आहेत त्या सुद्धा पुण्याच्या बाहेर गेल्यात आणि यासाठी कारण देण्यात आले आहे ट्राफिक जॅमचं…. गेल्या दहा वर्षात पुणे शहराच्या पायाभूत सुविधांवर नीट नियोजन करून कामे केले नसल्यामुळे सगळे परिणाम आज आपल्याला भोगायला लागत आहेत.”

“कुठल्याही सर्वसामान्य माणसाला सकाळी घरून ऑफिसला जायला दोन – दोन तास लागायला लागलेत तर ऑफिस मधून घरी येताना सुद्धा दोन तीन तासाचा प्रवास होतोय. महापालिकेकडून पुणेकरांची जीवनशैली सुसह्य करण्यासाठी काम करण्याचं आव आणून नको त्या गोष्टींवरती पैसे खर्च करण्यात आले आहेत.महत्त्वाचे चौक, मोठे जंक्शन या ठिकाणी उड्डाणपूल, ग्रेड सेप्रेटर टाकून वाहतूक कोंडी कमी करता आली असती.परंतु कोणीही या गोष्टींकडे पुढच्या ४० – ५० वर्षाचे नियोजन म्हणून पाहत नाही.”

“पोलिसांच्या वाहतूक विभागाचे देखील यात अक्षम्य दुर्लक्ष होतंय.सकाळी आणि संध्याकाळी ऑफिस वर्करची गर्दी रस्त्यावर असताना प्रत्येक चौकात ट्रॅफिक पोलीस ,वॉर्डन उपस्थित राहिलेच पाहिजे. सदर बाबतीत जर पुणेकरांची थोडीफार काळजी असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व या प्रकारापासून अनभिज्ञ असलेले उद्योगमंत्री यांनी योग्य ती पाऊले उचलावीत,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

राज्यातील जनता दुष्काळाने होरपळत असताना CM Eknath Shinde मात्र सुट्टीवर: Nana Patole

स्टंटबाजीच्या नादात बाबासाहेबांचा अपमान, नाक घासून माफी मागा; Amol Mitkari यांची Jitendra Awhad यांच्यावर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss