पुन्हा पुण्यात रिक्षा चालक होणार आक्रमक

पुन्हा पुण्यात रिक्षा चालक होणार आक्रमक

काही दिवसांपूर्वी पुण्यात रिक्षा चालक आक्रमक झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील रिक्षा चालकांना (Pune) चक्का जाम आंदोलन (rikshaw strike) चांगलच भोवलं होतं. आंदोलनात सहभागी असलेल्या ३७ रिक्षाचालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. ऑटो रिक्षा (auto rickshaw) बंद दरम्यान रिक्षाचालकावर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते बाबा आढाव यांच्या रिक्षा पंचायत समितीने निदर्शनं केली आहेत. कष्ट करणाऱ्या लोकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. हे गुन्हे मागे घेतले नाहीतर आम्हाला सत्याग्रह (Satyagraha) करून आंदोलन करावं लागेल, असा इशारादेखील बाबा आढाव यांनी दिला आहे.

आज १९ डिसेंबर सकाळी बाबा आढाव यांनी आणि रिक्षा पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Offices of Pune) एकत्र येत आंदोलन केलं, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनदेखील दिलं. रिक्षाचालकांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हे गुन्हे बेकायदेशीर आहेत. हातावर पोट असणाऱ्या सगळ्या रिक्षाचालकांवरील गुन्हे मागे घ्या, अशी मागणी बाबा आढाव यांनी केली आहे. ओला, उबेर आणि रॅपिडो (Rapido) यांच्यामुळे रिक्षाचालकांचं मोठं नुकसान होत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आता ओला, उबेर (Uber) आणि रॅपिडोचा वापर करायला लागल्याने रिक्षा चालक आक्रमक झाले आहेत. त्यांनी ओला, उबेर आणि रॅपिडो बंद करा अशी मागणी मागील काही दिवसांपासून लावून धरली आहे. रिक्षा चालकांच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत. मात्र रॅपिडो अजूनही सुरुच आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी चक्का जाम आंदोलन पुकारलं होतं. याच वेळी त्यांच्यावर गुन्हेदेखील दाखल झाले होते. हे गुन्हे मागे घेतले नाही तर रिक्षा पंचायत समिती सत्याग्रहाच्या मार्गाने महाराष्ट्रभर आंदोलन करेल, असा इशारा बाबा आढाव यांनी दिला आहे.

सर्वसामान्य पुणेकरांना वेठीस धरल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी रिक्षाचालकांविरोधात गुन्हे दाखल केले होते. पुण्यातल्या रिक्षाचालकांविरोधात गुन्हा बंडगार्डन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर (Keshav Kshirsagar) यांच्यासह ३७ जणांना अटक करण्यात आली होती. पुण्यातल्या रिक्षाचालकांना पोलिसांनी आंदोलन करू नका म्हणून कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती.

हे ही वाचा : 

भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर अडकणार विवाह बंधनात

भारतीय क्रिकेटपटू शार्दूल ठाकूर अडकणार विवाह बंधनात

कर्नाटकात गोंधळ निर्माण करणारं अँटी – हलाल बिल नक्की आहे तरी काय?

Follow Us टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version