Monday, July 1, 2024

Latest Posts

Chandrakant Patil यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर Rohit Pawar आणि Amol Mitakari संतापून म्हणाले, दादा तुम्ही….

रोहित पवार यांनी २०२३ च्या विधानसभा बसली अधिवेशनाची आठवत करून देत सांगितले की, राज्यात अमली पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण वाढत असून यामुळं युवा पिढीचं मोठं नुकसान होत असल्याचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मांडला होता.

पुण्यामध्ये ड्रग्स सापडल्याच्या घटनेमुळे विरोधकांनी सरकार विरोधात आवाज उठवण्याचा चित्र सध्या सगळीकडे पाहायला मिळत आहे. याच घटनेवरून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी आणि मंत्र्यांवर आरोप केले. ही घटना महायुती सरकारसाठी अडचणीची ठरत असल्याचे सध्या दिसत आहे. या परिस्थितीमध्ये अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये पुण्याच्या पालकमंत्री पदावरून शीतयुद्ध सुरु आहे. पुण्याच्या पालकमंत्री पदाचा कारभार सध्या अजित पवार हे पाहत आहेत. ड्रग्स प्रकरणावरून भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांचे संवाद साधला असता, मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नसल्याचा दावा केलाय.

चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी ट्विट करत संताप व्यक्त केलाय.चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणून चंद्रकांत दादा व्यथीत आहेत, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे पक्षाने त्यांच्याकडे पहावे त्यांना काय अधिकार आहेत? असा सवाल प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलाय.

याबाबत रोहित पवार यांनी २०२३ च्या विधानसभा बसली अधिवेशनाची आठवत करून देत सांगितले की, राज्यात अमली पदार्थांचं सेवन करण्याचं प्रमाण वाढत असून यामुळं युवा पिढीचं मोठं नुकसान होत असल्याचा मुद्दा लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत मांडला होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झालेल्या नवीन आव्हानांच्या अनुषंगाने केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित प्रयत्न करण्यात येत असल्याचं उत्तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं.  त्यानंतर आता ‘मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही’ असं सांगणाऱ्या चंद्रकांत पाटील दादांनी हे लक्षात घ्यायला हवं की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल ७ हजार कोटींचे ड्रग्स सापडलं आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या कॅथा इडूलीस या ड्रग्सचाही समावेश आहे. आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे उडते पुणे झाले आहे. पुणे शहरात दररोज कोट्यवधींचा अमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का? अधिवेशनात गृहमंत्र्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून मी पुण्यातील वाढत्या ड्रग्सचा मुद्दा समोर आणला होता, पण तेंव्हा फडणवीस साहेबांनी गोलगोल उत्तरं देऊन टाळाटाळ केली होती. सुपरफास्ट देवाभाऊ किमान संवेदनशील विषयांवर तरी सिरीयस व्हा… आजी-माजी पालकमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे, पक्षविस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा.. अन्यथा या सांस्कृतिक शहरासह हा महाराष्ट्र भकास व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे.

हे ही वाचा

वचन देते की, मी देशाच्या निस्वार्थ सेवेच्या….काय म्हणाल्या Varsha Gaikwad?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss