कसब्यात प्रचारामध्ये गुन्हेगार सुद्धा सामील, रुपाली पाटील यांचा आरोप

पुण्यामध्ये कसाबा (Kasaba) पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Assembly by-elections) प्रचार सुरु आहेत आणि या प्रचारामध्ये मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) हे गुंडाना घेऊन प्रचार करत आहेत असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे.

कसब्यात प्रचारामध्ये गुन्हेगार सुद्धा सामील, रुपाली पाटील यांचा आरोप

पुण्यामध्ये कसाबा (Kasaba) पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Assembly by-elections) प्रचार सुरु आहेत आणि या प्रचारामध्ये मंत्री गिरीश महाजन(Girish Mahajan) हे गुंडाना घेऊन प्रचार करत आहेत असा आरोप राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. पुण्यामधील संदीप मोहोळ (Sandeep Mohol) यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये ज्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यामधील संतोष लांडे (Santosh Lande) हा सध्या जामिनावर बाहेर आला आहे आणि त्याच्यावर आधी सुद्धा मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. संतोष लांडे याने गिरीश महाजनांसोबत प्रचार करत असतानाचे व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर टाकले आहेत. असे रुपाली पाटील म्हणाल्या गिरीश महाजन आणि त्यांच्या सोबत असलेले साहायक मतदारांना घाबरवण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत असे पत्रकार परिषदेमध्ये रुपाली पाटील यांनी आरोप केले आहेत.

पोटनिवडणुकीसाठी सध्या कसब्यामध्ये जोरदार दोन्ही पक्षांकडून प्रचार चालू आहेत आणि एकमेकांवर दोषरोप सुद्धा सुरु आहेत. त्यामध्येच रुपाली ठोंबरें (Rupali Thombare) यांनी गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले आहेत. त्या म्हणाल्या राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे आणि त्यात देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत त्यामुळे कसब्याच्या निवडणुकीमध्ये हिटलर शाही सुरु आहे. ज्या शहरामध्ये गुन्हेगारी रोखण्याचे प्रयन्त चालू आहेत त्याच शहरामध्ये भाजप गुन्हेगारांचा वापर प्रचारासाठी करत आहेत. हा सर्व प्रकार दुर्दैवी आहे ज्या गुन्हेगारांना शिक्षा झाली आहे ज्यांच्यावर मोक्का लावण्यात आला आहे अश्यांसोबत भाजप प्रचार करत करत आहे असा आरोप रुपाली ठोंबरें यांनी केला आहे.

कसब्याच्या पोटनिवडणुकीसाठी फक्त १० दिवस बाकी आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपचे दिग्गज नेते अमित शाह आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व नेते कसब्याच्या रस्त्यावर उतरलेले आहेत. मात्र या आधी भाजपची लोक कामासाठी आपल्या दारात किती वेळा आली या पूर्वी कितीवेळा आली आहेत हा विचार कसब्याची जनतेने करावा. गिरीश महाजन हे सुद्धा कसब्यामध्ये प्रचार करताना दिसत आहे आणि त्यांच्यासोबत त्याचे भाई आणि गुन्हेगार या प्रचारामध्ये सामील आहेत. पोटनिवडणुकीमध्ये भाईगिरी करून बैठक घेण्याचे काम सुरु आहे असे ते म्हणाल्या.

हे ही वाचा : 

पुण्यात निवडणुकीदरम्यान पाळला जाणार ड्राय डे, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय

ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून श्री महावीर जैन हॉस्पिटलचा करण्यात आला गौरव

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version