पुण्यातील वाहतूक कोंडीवर सत्यजित तांबे यांनी केलेले ट्विट चर्चेत

पुणे (Pune) शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे.

पुण्यातील वाहतूक कोंडीवर सत्यजित तांबे यांनी केलेले ट्विट चर्चेत

पुणे (Pune) शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. चांदणी चौकात (Chandni Chowk) पूल तयार झाल्यामुळे सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आता आमदार सत्यजित तांबे (MLA Satyaji Tambe) यांनी एक व्हिडिओ शेअर करत पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी ट्विट करून ट्रॅफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या आहेत आणि वाहतूक कोंडी बघता शहर विकासाला नियोजनाची जोड देणं, ही प्राथमिक गरज आहे हे स्पष्टपणे दिसत असल्याचं म्हटलं आहे.

सत्यजित तांबे यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘आयटी हब’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात ट्राफिकच्या समस्येमुळे मागील काही वर्षांत बऱ्याच आयटी कंपन्या पुणे सोडून गेल्या होत्या. तरी देखील अजूनही शहरातील ट्रॅफिकचं चित्र तसंच असल्याचं दिसतंय. चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाचे उद्घाटन तर झाले, मात्र परिस्थिती अजून बिकट झालेली दिसतेय. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ३९७ कोटी खर्च करून ८ रॅम्प, २ सर्व्हिस रोड, २ अंडरपास, ४ पूल असे १७ किलोमीटर रस्त्याचे काम केलेले आहे. मात्र या रस्त्यांवर काही ठिकाणी मार्गदर्शक फलक आहेत, तर काही ठिकाणी फलक लावलेले दिसत नाहीत. यामुळे वाहनचालकांना रस्ता समजत नाही आणि जेथे फलक लावले आहेत ते दिसत नाहीत. रस्ता चुकला की, नागरिकांना दोन-दोन किलोमीटर फिरून यावं लागत आहे. नवीन रस्ते झाले असले तरी पादचाऱ्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागतोय, तसेच सर्व दिशांनी एकत्र येणाऱ्या अनेक रस्त्यांमुळे अपघाताची भीतीही वाढली आहे. त्यामुळे फक्त वाहतूक कोंडीच नाही, तर लोकांची मानसिक कोंडी देखील होतेय. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी अवाढव्य खर्च करून नवीन रस्त्यांचा अट्टहास केला असला तरी समस्या काही सुटलेली दिसत नाही. हे सर्व बघता शहर विकासाला नियोजनाची जोड देणे, ही प्राथमिक गरज आहे हे स्पष्टपणे दिसतंय.

पुणेकर वर्षभरापासून या चांदणी चौकातील काम पूर्ण होण्याची वाट बघत होते. वर्षभर या पुलाच्या कामामुळे नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागला.यावेळी वेगवेगळ्या मार्गावरील रस्ते बंद ठेवण्यात आले होते. काम पूर्ण करण्यासाठी रात्रदिवस काम करण्यात आले. त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर या पुलाचे उदघाटन करण्यात आले मात्र हा भूलभुलैया तयार झाला आहे असे नागरिकांनाचे मत आहे.

हे ही वाचा: 

दिल्लीतील G20 परिषदेवर संजय राऊत यांची टीका…

G20 परिषदेत पंतप्रधानांसमोर लावलेल्या नावाच्या फलकावर INDIA ऐवजी BHARAT…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version