spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी!, भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांचं निधन

Girish Bapat : भाजपचे जेष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे.

Girish Bapat : भाजपचे जेष्ठ नेते पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दीर्घ काळापासून आजारपणाविरुद्ध बापटांची झुंज सुरु होती. अखेर हि झुंज आज संपली आहे. गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात झाला. भाजपचे नेते गिरीश बापट यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करून केली होती. १९८० मध्ये त्यांची पुणे शहर भाजपच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात अली होती. १९८३ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ते पहिल्यांदा पुणे महानगरपालिकेवर निवडून आले होते त्यानंतरच्या तीन वेळा जिंकले. १९८६-८७ मध्ये त्यांची पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाली . १९९५ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले १९९५ पासून सलग ५ टर्म ते निवडून आले होते. १९९७ मध्ये त्यांची कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या संचालकपदी नियुक्ती झाली. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुणे मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले.

एक मृदुभाषी, संवेदनशील आणि लोकांसाठी झटणारा सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून गिरीषजी कायम स्मरणात राहतील.

Latest Posts

Don't Miss