spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं, शरद पवार

पिंपरी चिंचवड शहराचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे.

पिंपरी चिंचवड शहराचे अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज पुण्यातील मोदीबाग येथे पक्षप्रवेश करण्यात आला. भोसरी विधानसभेतील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे.

माझी ओळख जादूगार म्हणून केली जाईल असं मला वाटलं नव्हतं. आमच्या इथे कॉलेजात एक जादूगार राहत होते. त्यांची भेट घ्यायचो. काही जादू शिकता येते का ते पाहायचो. चेष्टेचा भाग सोडून द्या. तुम्हाला भेटता आले याचा आनंद आहे. असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे पत्रकार संघात वार्तालाप म्हटले आहे. पुढे शरद पवार म्हणाले की, पत्रकार आणि वृत्तपत्र यांच्याशी ठरवून माझा कधी न कधी संबध आला. सकाळ वृत्तपत्रात मी आणि माझे मित्र विठ्ठल मणियार यांनी मुलाखत दिली होती त्यानंतर आमची निवड झाली. नंतर आपणच एक वृत्तपत्र काढावे असं वाटलं नंतर मग मी आणि माझे मित्राने नेता हे वृत्तपत्र काढले, थोडे दिवस चाललं नंतर बंद पडलं. असे बोलत असताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पुढे शरद पवार म्हणाले की, काँग्रेसकडे अधिकचे मतं होती. आमच्याकडे बारा मतं होती. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आमच्यापेक्षा जास्त मतं होती. काँग्रेसने पहिले मतं त्यांच्या उमेदवाराला देणं साहजिकच आहे. पण, उरलेली पहिली आणि दुसऱ्या पसंतीक्रमाची मतं योग्यपणे दिली असती तर तिन्ही उमेदवार निवडून आले असते. पण, आमची रणनीती चुकली, असे शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले की, जयंत पाटील यांच्याबाबत महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांमध्ये निर्णय झालेला नव्हता. माझ्याकडे १२ मतं होती. शेकापच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं आम्हाला वाटत होतं. कारण, लोकसभा आम्ही डाव्या पक्षांसोबत लढवली होती. त्यांनी काही जागा मागितल्या होत्या, पण ते आम्ही देण्याच्या स्थितीत नव्हतो. त्यामुळे जयंत पाटील यांना आम्ही पाठिंबा देण्याचं ठरवलं होतं, असेही शरद पवार यांनी सांगितले.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की, मला ताप होता. मात्र, भुजबळांनी भेटायचा आग्रह धरला. महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी आहेत असे ते म्हणाले. जरांगेंशी मुख्यमंत्री शिंदेसोबत काय चर्चा केली हे आम्हाला माहीत नाही. सरकारने जरांगेंना काय आश्वासन दिले, ओबीसी आंदोलकांना काय आश्वासन दिले याचे वास्तव समोर येत नाही तो पर्यंत बैठकीला जायचे नाही, अशी आमची भूमिका होती. शिंदेंनी मनोज जरांगे आणि हाके यांच्याशी चर्चा काय केली हे मला माहीत नाही. सरकारने आरक्षणावर सामंजस्याची भूमिका घ्यावी असे शरद पवार म्हणाले. शरद पवार म्हणाले, सरकारने मनोज जरांगे पाटील यांना काय आश्वासन दिलं हे मला माहिती नाही. मात्र, आज राज्यात शांततेची गरज आहे याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. ती शांतता निर्माण व्हायलाचं पाहिजे या मताचा मी आहे. तसंच, जरांगे यांच्यासोबत जर सरकारने संवाद साधला असेल तर त्यामध्ये विरोधकांचं काय काम असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. तसेच अगोदर विरोधकांना बाजूला ठेवलं आणि आता विचारतायेत असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार म्हणाले की, अरे ती बारामती आहे. लोकांशी वैयक्तीक संबंध ठेवले पाहिजे. याआधी मी फक्त शेवटची सभा घ्यायचो. मी ५० टक्के लोकांना नावाने ओळखायचो. पण आता जुनी लोकं नाहीत. मला खात्री होती की लोक सुप्रियाला निवडून देतील. घरात सगळ्यांना जागा आहे. पक्षात जागा आहे की नाही हा व्यतिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी या संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीनं उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेल आणि ते तयार झाले तर मग काय असेल तो निर्णय घेईन असेही शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

ASHADHI EKADASHI 2024 : CM EKNATH SHINDE यांनी आषाढी एकादशी निमित्त मागितले विठुरायाकडे साकडे

CM EKNATH SINDE यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा संपन्न; १०३ कोटी रुपये निधीची केली घोषणा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss