Wednesday, July 3, 2024

Latest Posts

Loksabha Election 2024: लोकांनी दाखवून दिलं की वातावरण बदलत आहे, Sharad Pawar मोठे वक्तव्य

शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर भाष्य करत, "राजकारणात कमी जास्त होत असत, नव्या उमेदीने कामाला लागायचं असतं," असे वक्तव्य केले."

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे आज (मंगळवार, १८ जून) बारामती (Baramati) तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यावरून बारामती तालुक्यातील निंबूत या गावांमध्ये शरद पवार दाखल झाले असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून फटाके वाजवून, तुतारी वाजवत जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर माध्यमांशी संवाद साधत शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर भाष्य करत, “राजकारणात कमी जास्त होत असत, नव्या उमेदीने कामाला लागायचं असतं,” असे वक्तव्य केले.”

यावेळी ते म्हणाले, “पक्षाच्या वतीने १० जागा निवडणूक लढलो, ८ ठिकाणी लोकांनी उमेदवार निवडून दिले,अन् लोकांनी कळवून दिलं की वातावरण बदलत आहे. मला माहिती होत की या निवडणूकीचा निकाल वेगळा लागेल, याची खात्री होती. अनेक अडचणी आहेत,आता साखर बाबत अडचण सांगितली,पाणी प्रश्न आहे, पूर्ण राज्यात धरण स्थिती सुधारली पाहिजे, सत्ता लोकांसाठी वापरायला पाहिजे. मी राज्यात फिरत होतो,पण या गावात येत नव्हतो,स गळ सांगायची गरज नाही, जुनं विसरायला पाहिजे, पण काही दोन चार सहकाऱ्यांनी साथ सोडली नाही, राजकारणात कमी जास्त होत असत, नव्या उमेदीने कामाला लागायचं असत. प्रश्न अनेक आहेत, विकासाचे प्रश्न काही असतील तर मी आणि खासदार लक्ष घालून कुठलेही राजकारण न करता काम करू. तुम्ही सगळ्यांनी स्वागत केले त्याचे आभार मानतो.”

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghdi) महाराष्ट्रात चांगले यश प्राप्त झाले. याउलट महायुतीला (Mahyuti) अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. बहुचर्चित बारामती लोकसभा मतदारसंघातही (Baramati Loksabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा पराभव केला. लोकसभा निवडणुका देशभरात पार पडल्या असल्या तरी आता काही महिन्यांतच राज्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. त्यादृष्टीने महाविकास आघाडीत हालचालींना वेग आला आहे.

हे ही वाचा

आज मी जी काही आहे, ती फक्त…Varsha Gaikwad यांची भावनिक पोस्ट, म्हणाल्या..

Ravindra Waikar घाबरट माणूस आम्हाला काय ज्ञान देतो? Sanjay Raut यांचे टीकास्त्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss