सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मेंढपाळाचा अपघात, जागीच मृत्यू

दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. देशातील रोजच्या अपघातांच्या संख्येत काही कमी होताना दिसत नाही. मागेच रेल्वेच्या झालेल्या अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता.सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेला असून यात एका मेंढपाळाचा (shepherd) दुर्दैवी अपघात झाला आहे.

सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मेंढपाळाचा अपघात, जागीच मृत्यू

दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. देशातील रोजच्या अपघातांच्या संख्येत काही कमी होताना दिसत नाही. मागेच रेल्वेच्या झालेल्या अपघातात शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. त्यातच आता यात आणखीन एका अपघाताची यात भर पडली आहे. हा अपघात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेला असून यात एका मेंढपाळाचा (shepherd) दुर्दैवी अपघात झाला आहे.

या अपघाताच्या वेळी एक मेंढपाळ (shepherd) पाणी आण्यासाठी रस्ता क्रॉस करत होता. हा रस्ता क्रॉस करत असताना एका टँकरची मेंढपाळाशी (shepherd) धडक झाली. टँकर आणि मेंढपाळाची धडक होऊन झालेल्या या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी शिवारात रविवार १६ जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता ही घटना घडली आहे. नारायण रूपनवर असे मृतव्यक्तीचे नाव होते ते ५२ वर्षांचे होते.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देवडी फाटा परिसरात दत्तू माणिक पिंगळे रा गोरडवाडी, शिवाजी हनुमंत खरात रा कासारवाडी, जगन्नाथ महादेव खरात रा कासारवाडी, सुरेश दशरथ कोळेकर रा धुळदेव, राजेंद्र धुळा रुपनवर रा रेडे हे सर्व मेंढ्या चारत होते.त्यावेळी धुळा नारायण रुपनवर (मृतव्यक्ती) यांना तहान लागल्याने पाणी आणण्यासाठी म्हणून तो रस्ता क्रॉस करून जात असताना, मोहोळहून पुण्याकडे जाणारा टँकर क्रमांक एम एच १३ ए एन ३२४६ याने त्यांना जोराची धडक दिली, त्यात धुळा रुपनवर (मृतव्यक्ती) यांच्या गुडघ्याला व डोक्याला मार लागल्याने तो यामुळे गंभीर जखमी झाला.

त्यानंतर त्यांना तातडीने मोहोळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात ( hospital) दाखल केले असता, ते आधीच मृत पावले आहेत असे डॉक्टरांनी(Doctors) सांगितले. या सादर अपघाताची तक्रार राजेंद्र धुळा रुपनवर वय (३३) रा रेडे यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल असून टँकर चालक अंकुश अर्जुन शनमारे रा नरखेड ता मोहोळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार करत आहेत.

हे ही वाचा:

चेन्नई सुपर किंग्सचा सलामी फलंदाज विजेतेपद जिंकताच अडकला लग्न बंधनात

Hidden Forts In Pune,पावसाळ्यात या किल्ल्यांना भेट द्यायला विसरू नका

Odisha Train Accident, रेल्वे अपघाताची माहिती देणारी व्यक्ती कोण?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version