Shivjaynti 2023, शिवजन्मोत्सव सोहळ्यात पाळणा, साहसी खेळ आणि घोषणांनी दुमदुमला शिवनेरी परिसर

१९ फेब्रुवारी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज जयंती आहे. शिवनेरी किल्ल्यावर आज मोठ्या जल्लोषात छत्रपतींची जयंती साजरी करण्यात येत आहे.

Shivjaynti 2023, शिवजन्मोत्सव सोहळ्यात पाळणा, साहसी खेळ आणि घोषणांनी दुमदुमला शिवनेरी परिसर

१९ फेब्रुवारी महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज जयंती आहे. शिवनेरी किल्ल्यावर आज मोठ्या जल्लोषात छत्रपतींची जयंती साजरी करण्यात येत आहे. या महोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis), भाजप नेते प्रविण दरेकर (BJP leader Pravin Darekar) उपस्थित आहेत आणि शिवप्रेमी सुद्धा या किल्ल्यावर उपस्थित आहेत. जयंतीच्या दिवशी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आहे. मोठ्या जल्लोषामध्ये आणि उत्साहामध्ये सोहळा संपन्न झाला आहे. शिवायच्या जयंती साठी पालन तयार करण्यात आला होता आणि या पाळण्याला फुलाची आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली होती. महिलांनी पारंपरिक वेष परिधान करून त्यांनी हा जन्मोत्सव साजरा केला. संपूर्ण महाराष्ट्र्मध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सवामध्ये मोठ्या उत्साहाने शिवभक्तांनी साहसी खेळ सादर केले आणि ढोल ताशांचा गरज सुद्धा करण्यात आला. अनेक शिवभक्तांनी साहसी खेळांचे सादरीकरण केले. पोलीस खात्याकडून मानवंदना देण्यात आली. पोलिसांच्या बॅड पथकाने राष्ट्रगीत सादर करून मानवंदना दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे उपस्थित असताना शासकीय सोहळा पार पडत होता तेव्हा छत्रपती संभाजीराजे हे गडावर पोहोचले. शिवनेरीच्या ठिकाणी शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. या गर्दीमध्ये सामान्य शिवभक्तांची अडवणूक झाल्याने संभाजीराजे छत्रपती चांगलेच आक्रमक झाले. संभाजीराजे संतप्त होऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समोर आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्टेजवर असताना छत्रपती संभाजीराजे राजे यांनी भाषण सुरु केलं होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेकांनी विनंती करुनही छत्रपती संभाजीराजे स्टेजवर गेले नाहीत. यानंतर सामान्य शिवप्रेमींच्या विजय व्हावा अशी त्यांनी मागणी केली. पुढच्या वर्षीपासून कोणत्याही शिवभक्तांची अडवणूक केली जाणार नाही असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आणि छत्रपती शिवरायांच्या विचारानेच हे सरकार काम करत आहे असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले हे सरकार सर्वसामान्यांचे आहे असे ते म्हणाले. शिवरायांचा मावळा हा आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आहे आणि आता गडावर येण्यासाठी कोणत्याही शिवभक्तांची अडवणूक केली जाणार नाही पुढच्या वर्षी शिवजयंतीचे नियोजन करताना शिवभक्तांचे आधी विचार करू असे ते म्हणाले आणि ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम सरकार करेल असा विश्वास मुख्यमंत्री व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : 

Nagpur duronto express मधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना मोजावे लागणार जास्त पैसे, १५ जूनपासून ऑनलाईन रिझर्वेशन होणार बंद

निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या मालमत्तेचे काय ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version