Shivajirao Adhalarao Patil यांची उमेदवारी निश्चित ?, एकाच गाडीतून केला प्रवास

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे.

Shivajirao Adhalarao Patil यांची उमेदवारी निश्चित ?, एकाच गाडीतून केला प्रवास

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. नुकतंच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणूक तोंडावर आल्या आहेत. या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष हे जोरदार तयारीला लागले आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. तर आता सगळीकडे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) शिरुरच्या (Shirur) उमेदवारीवरून चांगलीच चर्चा रंगली आहे.

शिरुरच्या (Shirur) उमेदवारीसाठी आता शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांचा अजित पवार (Ajit Pawar) गटात प्रवेश निश्चित झाल्याचीच चर्चा आहे. अजित पवार मंचरमध्ये विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी आणि शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेसाठी आले असताना त्यांच्या स्वागतासाठी आढळराव पाटील उपस्थित होते. आढळराव पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कधी प्रवेश करणार याची सध्या मतदारसंघात चर्चा रंगली आहे. मात्र, उमेदवारी नक्की कधी जाहीर होते आणि पक्षप्रवेश कधी होतो हे ही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. अश्यातच या कार्यक्रमासाठी आज शिवाजी आढळराव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्वागत करत त्यांच्यासोबत एकाच गाडीत प्रवास केल्याने राजकीय भूवया उंचावल्या आहेत.

तर दुसरीकडे अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांची खिल्ली उडवली आहे. मी जरी कडू बोलत असलो तरी शब्दाचा पक्का आहे. मागच्या वेळी मीच अमोल कोल्हे यांच्यासाठी मत मागायला तुमच्याकडे आलो होतो. त्यांचे वकृत्व चांगलं होते. दिसायला राजबिंडा आहे. त्यावेळी मी सांगितलं म्हणून तुम्ही अमोल कोल्हे यांना निवडून दिलं. पण आता तो बाबा काही दिवसांनी राजीनामा द्यायचं म्हणत होते. ते म्हणाले होते, मी अभिनेता आहे, मला मतदारांना वेळ देता येईना. माझ्या क्षेत्रात माझं नुकसान व्हायला लागलं. मुळात कोल्हे यांचं राजकारण हे पिंड नाहीच. आम्हाला उमेदवार भेटला नाही की आम्ही कलाकाराला उभं करतो, अमोल कोल्हे त्यापैकीच एक आहे. राजेश खन्ना, शत्रुघ्न सिन्हा, हेमा मालिनी, गोविंदा, अगदी अमिताभ बच्चन हे ही निवडून आले. मग त्यांनी राजीनामा दिला. पण त्यांना मतदारांचे काही पडलेलं नसतं. आपण राजबिंडा पाहून निवडून देतो. त्यात आमची चूक आहेच. समाजातला असा कुठलाही घटक राहता कामा नये. आपल्या विचाराचा खासदार आपण निवडून दिला गेला तर आपल्याला काम व्हायला मदत होणार आहे. विरोधी पक्षाचा खासदार केला की नुसता तलवार काढतो आणि नुसता लढत बसतो. ते ही नाट्य प्रयोगातून, असे अजित पवार यांनी म्हटले.

हे ही वाचा:

मराठा समाजाचे आरक्षण १६ टक्क्यांवरून १० टक्क्यांवर आणले, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली आकडेवारी

मराठा आरक्षण जाहीर केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिले धन्यवाद

पुण्यात दीड दिवसांत ६०० किलो ड्रग्स जप्त, कुरकुंभमध्ये ड्रग्सचा अड्डा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version