पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस!, मध्यरात्री तरूणावर वार करत हत्या…

१० ते १२ जणांनी मिळून या तरूणाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस!, मध्यरात्री तरूणावर वार करत हत्या…

पुण्यामध्ये गुन्ह्यांच्या घटनेत सध्या वाढ होताना दिसत आहे. काल शहरात एका तरूणावर चाकूने वार करत हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समेर आली आहे. १० ते १२ जणांनी मिळून या तरूणाची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ही घटना काल १५ ऑगस्ट रोजी पुण्यातील मंगला टॉकीज परिसरात रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताच लोकांच्या गर्दीत हत्तेकरांनी या तरूणाला घेरले. त्याच्या डोक्यात,मानेवर तलवार, पालघन, लोखंडी गज, काठ्या आणि फरशीच्या तुकड्यांनी दहा ते बारा जणांनी मिळून तरूणावर वार केले. या तरूणावर तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड अशा हत्यारांनी वार करण्यात आले.या घटनेत तरूणाचा जागीच मृत्यु झाला आहे. नितीन मस्के असे मृत्यु झालेल्या तरूणाचे नाव आहे. नितीन म्हस्के आणि हल्ल्या करण्यात आलेल्या मुलांमध्ये वाद होता. हाच वाद टोकाला जाउन ही हत्या करण्यात आली असल्याचा आंदाज स्थानिक पोलीसांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर तरूणाच्या हत्येविरोधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.

पुण्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात सागर कोळानट्टी ऊर्फ यल्ल्या (वय 32), मलिक कोळ्या ऊर्फ तुंड्या (वय 24), इम्रान शेख (वय 32), पंडित कांबळे (वय 27), विवेक नवधर ऊर्फ भोला (वय 24), लॉरेन्स पिल्ले (वय 33), सुशील सूर्यवंशी (वय 30), मनोज हावळे ऊर्फ बाबा (वय 25), आकाश गायकवाड ऊर्फ चड्डी (वय 24), रोहन ऊर्फ मच्छी मल्लेश तुपधर (वय 20), विवेक भोलेनाथ नवधरे (वय 27), अक्षय ऊर्फ बंटी साबळे (वय 21), विशाल भोले (वय 30, सर्व रा. ताडीवाला रोड) यांच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाची इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करणारे मुंबईतील दोन तरुण अटकेत…

महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ‘या’ महाराजाला अटक…

स्वातंत्र्यदिनी निमित्त पुण्यासह राज्यातील १८६ कैद्यांची होणार सुटका…

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version