spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

“तेव्हापासून तर मी दिल्लीच्या संसदेत जायला घाबरतो” शरद पवारांनी मोदींना अप्रत्यक्षपणे लगावला टोला

नुकतच पुण्यामध्ये जागतिक मराठी संमेलनाचा कार्यक्रम पार पडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळेस शरद पवार (Sharad Pawar) यांनी या कार्यक्रमात भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना अप्रत्यक्षरीत्या टोला लगावला आहे. अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलेल्या विधानाचा उल्लेख करत ते म्हणाले, “तेव्हापासून दिल्लीच्या संसदेत जायलाही घाबरत आहे “. आणि पंतप्रधान मोदी यांना अप्रत्यक्ष टोलाही लगावला आहे. यावेळेस माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

पुण्यात पार पडलेल्या जागतिक मराठी संमेलनाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि माजी मुख्यमंत्री सुशील सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी हजेली लावली होती. या कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे (Sushilkumar Shinde) म्हणाले की “ते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या तालमीत तयार झाले”. याच विधानावरून शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वक्तव्याचा उल्लेख करत मोदींना अप्रत्यक्ष टोला लगावला. शरद पवार यांनी सांगितलं की “आता मी सुशीलकुमार शिंदे यांचा उल्लेख आवर्जून करु इच्छितो, कारण आता बोलता-बोलता सुशीलकुमार शिंदे म्हणाले की “मी शरद पवारांच्या तालमीत तयार झालो”. हल्ली मला असं कोणी म्हटलं की भीती वाटते. त्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी कोणीतरी म्हटलं की शरद पवारांचे बोट धरुन राजकारणात आलो. तेव्हापासून तर मी दिल्लीच्या संसदेत जायलाही घाबरतो, शरद पवार यांच्या या विधाना नंतर सभागृहात सर्व हसायला लागले. कारण असं म्हणत शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाव न घेता मोदींना (PM Narendra Modi) टोला लगावला आहे.

यावेळी या कार्यक्रमात जेष्ठ अभिनेते मोहन आगाशे (Mohan Agashe) यांना जागतिक मराठी पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला डॉ. पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते.

हे ही वाचा:

लिक्विड डाएट घ्या आणि लवकरात लवकर करा वजन कमी

आधी वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर करता? जाणून घ्या किती आहे घातक

Makar Sankranti 2023 , मकर संक्रांतीला लहान मुलांचं बोरन्हाण का करतात ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss