आळंदीतील इंद्रायणी नदीत साबणाच्या फेसासारखे पाणी

पुण्यातील आळंदी वारकरी संप्रदायासाठी पवित्र मानले जाणारी इंद्रायणी नदीची फार दयनीय अवस्था झाली आहे. इंद्रायणी नदीतील पाणी हे साबणाच्या फेसासारखे वाहत आहे. प्रशासन नेहमी सांगत असते कि, नद्यांमध्ये सांडपाणी सोडू नये, परंतु पिपरी चिंचवडमधील कंपन्या दूषित पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडत आहेत.

आळंदीतील इंद्रायणी नदीत साबणाच्या फेसासारखे पाणी

पुण्यातील आळंदी वारकरी संप्रदायासाठी पवित्र मानले जाणारी इंद्रायणी नदीची फार दयनीय अवस्था झाली आहे. इंद्रायणी नदीतील पाणी हे साबणाच्या फेसासारखे वाहत आहे. प्रशासन नेहमी सांगत असते कि, नद्यांमध्ये सांडपाणी सोडू नये, परंतु पिपरी चिंचवडमधील कंपन्या दूषित पाणी इंद्रायणी नदीमध्ये सोडत आहेत. या जलप्रदूषणामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. आळंदी शहरातून वाहणाऱ्या नदीचा उगम हा लोणावळ्यात होतो. पिंपरी- चिंचवड हे एक मोठं औदयोगिक क्षेत्र आहे. लोणावळा ते आळंदी या मार्गावर पिंपरी- चिंचवड हे औदयोगिक क्षेत्र वसवलेलं आहे. कंपन्या असल्यामुळे साहजिक आहे कि दूषित पाणी त्या कंपनीचे बाहेर पडणार. कंपन्यांचे दूषित पाणी फेसाळलेले पाणी कंपन्या नदीमध्ये सोडत आहेत आणि त्यामुळे त्या नदिची अवस्था खराब झाली आहे.

अनेक वर्षांपासून वारकरी आणि गावकरी या संदर्भात प्रशासनाला अनेक निवेदन देत आहेत. कारण मागील अनेक वर्षांपासून नदीच्या पाण्यात प्रदूषणात वाढ होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आळंदी दौऱ्यावर असताना गावकऱ्यांनी त्याच्याकडे देखील नदीच्या प्रदूषणाचे निवेदन केले होते. पण माझं त्यावर काही तोडगा निघाला नाही. आळंदीत दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. इंद्रायणी नदीच्या पाण्यात स्नान करतात. पाणी तीर्थ म्हणून पितात इंद्रायणी नदीचं पाणी हे प्रत्येक वारकरी भाविकांसाठी तीर्थ आहे परंतु दौऱ्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सुद्धा यासंदर्भात सांगितले कि याबाबत कोणतीही चौकशी नाही असे गावकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे या नदीकडे शासनाचे लक्ष असणे गरजेचे आहे असे नागरिकांना सांगितले आहे.

लाखो भाविक नदीमध्ये स्नान करतात या नदीमध्ये कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी आहे. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. कंपन्यांमधील रसायना मुळे नागरिकांना त्वचारोगाच्या समस्या देखील उदभवू शकतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. शासनाने या नदीकडे लक्ष देण्याची गरज आहे. दूषित पाण्यावर तोडगा काढण्याची गरज आहे. इंद्रायणी नदीकाठी अनेक गावे आहेत आणि शेतीदेखील आहे. प्रदूषित पाण्यामुळे शेतीच आरोग्य सुद्धा धोक्यात आले आहे . शेतीसाठी लागणारी जनावरे देशील नदीतील पाणी पित असतात. जनावऱ्याच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या नदीत प्रक्रिया न करता पाणी सोडले जाते, त्यामुळे या रसायन युक्त सोडले तर या कंपन्यांवर कारवाई केली जाते आणि मागणी नागरिकांनी केली आहे.

हे ही वाचा:

Budget 2023, २०२३-२४ ची अर्थसंकल्पना कोण सादर करणार? वेळ, तारीखसह जाणून घ्या सविस्तर माहिती

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी !: नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version