Friday, July 5, 2024

Latest Posts

नक्की सरकार किती इंजिनचे हेच कळत नाही, Supriya Sule यांचे सरकारवर ताशेरे

१५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी पुणे (Pune) येथे माध्यमांशी संवाद साधतांना विचारला. आचारसंहितेमुळे मागील ३ ते ४ महिने कोणताच रिव्ह्यू घेता आला नाही. रिझल्ट लागून एक महिना झालेला आहे. त्यामधील दोन सेशन पार्लिमेंट सेशनमध्ये गेले. गडकरी साहेबांची भेट घेतली. अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांसोबत रेल्वे संदर्भात सविस्तर चर्चा झाली. पियूष गोयल यांसोबत दूध आणि कांद्याची आयात आणि निर्यात याची नक्की काय पॉलिसी आहे, हे बघितलं पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या. अतिशय गंभीर आव्हाने या देशासमोर असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

नीट परीक्षेच्याबाबतीत सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षेत मेरिट वर कोणालाच न्याय मिळत नाही. सरकारला विनंती होती की, नीट (NEET) परिक्षांवर चर्चा करावी. राजकारण बाजूला ठेवून या गोष्टींचा विचार करायला हवा. आर. एस. एस.चे आभार मानते की, भ्रष्टाचाराबद्दल त्यांनी विषय मांडला. महाराष्ट्रात न्याय मिळत नसेल तर आणखी भ्रष्ट्राचार वाढत असेल. तर आम्ही न्याय कोणाकडे मागणार, पार्लमेंटकडे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

पिक विमा (Crop Insurance) या विषयावर बोलतांना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या की, हा क्लेमचा विषय सातत्याने निघतो. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप या सत्ताधारी लोकांनी केलं आहे. राहुल गांधी वारीमध्ये कधी चालणार, याची तारीख अजून माझ्याकडे आली नाही. पवार साहेब उद्या पासून दोन ते तीन दिवस त्या भागात असतील, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. सध्या चर्चेत असलेल्या लाडकी बहीण योजेबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कोविडमध्ये यांनी स्वत:चे फोटो सोडले नाही. नक्की सरकार किती इंजिनचे आहे हेच कळत नाही. बॅनर वॉरमध्ये कोण श्रेय घेत आहे हे दिसतंय. १५०० रुपयांमध्ये महागाईच्या काळात महिलांना फायदा होणार आहे का? याचाही विचार केला पाहिजे, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्पष्ट केले.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss