चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्त्या

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात (Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भर दिवसा हत्या करणे, खून यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चारित्र्यावर संशय घेत पतीने केली पत्नीची हत्त्या

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात (Pune) दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. भर दिवसा हत्या करणे, खून यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशीच एक घटना आता पुण्यात घडली आहे. चारित्र्यच्या संशयावरून पतीने पत्नीची गळा चिरून हत्या करण्याची घटना पुण्यातील येरवडा भागात घडली आहे. लग्नच्या दीडवर्षेनंतर पतीने पत्नीची हत्त्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण येरवडा परिसरत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा धक्कादायक प्रकार ९ सप्टेंबर रोजी घडला आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. या घटनेचा विमानतळ पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे.

पुण्यातील रुपाली उर्फ बबिता भोसले (वय ३५ वर्षे) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर या खुनाच्या आरोपात पती आशिष भोसले याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी स्वप्नी बाळासाहेब खांडवे यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपी आशिष भोसले याला अटक करण्यात आली आहे. रुपाली आणि आशिष यांचं दीड वर्षपूर्वी लग्न झाले होते. त्यांना ७ महिन्याची मुलगी देखील आहे. ते लोहगावमधील संतनगरमध्ये ते भाड्याने घेतलेल्या घरात राहत होते. आशिष हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करतो तर रुपाली धुणे-भांडी करुन घर चालवत होती. मागच्या काही दिवसांपासून आशिष रुपालीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत होता. त्याच्यामध्ये अनेकवेळा भांडणं पण झाली होती. शनिवारी रात्री आशिषने तिला शिवीगाळ करून त्याच्यात खूप भांडण झाले. त्यानंतर आशिषने तिच्या मानेवर , पोटावर,आणि गळ्यावर चाकू फिरवून तिला जखमी केलं. या घटनेची माहिती मिळताच शेजाऱ्यांनी पोलिसात माहिती दिली. नंतर लगेच रूपालीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार आधी तिचा मृत्यू झाला.

परीमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विला सोंडे हे घटनास्थळी दाखल झाले. पतिनीची हत्या करण्याच्या आरोपाखाली पती आशिष भोसले याला अटक करण्यात आली आहे. विमानतळ पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धामणे हे या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा: 

ठाणे पाठोपाठ आता मराठवाड्यात देखील चक्क जामची हाक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version