#HarSawalUthega म्हणत प्रजासत्ताक दिनानिमित्त टाटा कंपनीने लहान मुलांसाठी नवी मोहीम घेतली हाती

यावेळी या मोहिमेत टाटा सॉल्ट, शिक्षक, पोलीस, अभिनेते आणि व्यावसायिकांची ज्युरी म्हणून निवड करेल.

#HarSawalUthega म्हणत प्रजासत्ताक दिनानिमित्त टाटा कंपनीने लहान मुलांसाठी नवी मोहीम घेतली हाती

‘देश की सेवा, देश का नमक’ ही थीम केंद्रस्थानी ठेवत टाटा सॉल्ट ह्या देशातील अग्रगण्य आयोडीन युक्त मिठाच्या विक्रेता कंपनीने, देश के लिये #HarSawaalUthega नावाची मोहीम प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे त्यांनी लहान मुलांना त्यांच्या मनातील प्रश्न उपस्थित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ही मोहीम राबवण्यात येत आहे. देशातील महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, गुजरात, चेन्नई, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि राजस्थन या राज्यात ही मोहीम राबवली जात आहे.

पुणे शहरातील सूर्यदत्त नॅशनल स्कूलमध्ये २०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबवण्यात आला. “जास्त मुली आयपीएस कशा बनू शकतील?”, “मी माझे शहर पुणे प्रदूषणमुक्त कसे ठेवू शकतो?” यासह अनेक वेगळे आणि नवे प्रश्न मुलांकडून विचारण्यात आले. तसेच पुण्यातील मुलांनी “मासिक पाळीबद्दल इतके गैरसमज का आहेत?” असेही काही प्रश्न विचारले आणि त्याच्यावर मनमोकळेपणाने या कार्यक्रमात मुलांशी संवाद साधण्यात आला.

मुलांच्या या प्रश्नांची उत्तरे, भाजप महाराष्ट्राच्या प्रवक्त्या आणि माजी उपमख्यमंत्री यांच्या सल्लागार श्वेता शालिनी, पुणे पोलिस डीएसपी संतोष गायके आणि सूर्यदत्त शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष संजय चोरडिया या प्रमुख पाहुण्यांनी दिली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून एकूण ३०० प्रश्न उपस्थित करण्यात आले ज्यातले ५० प्रश्न निवडण्यात आले. तसेच ज्युरींना ५० प्रश्र्नांपैकी ३ सर्वोत्तम प्रश्न निवडून त्या विद्यार्थ्यांना पुस्तकं देऊन सन्मानित देखील केले.

या मोहिमेचा एक भाग म्हणून टाटा सॉल्टने भविष्यात पुन्हा एकदा, ३० हजार पेक्षा खाजगी आणि सरकारी शाळांची निवड करून ही मोहीम पुन्हा एकदा राबवणार आहे. ज्यात ते यावेळी प्रमाणेच सर्वोत्तम प्रश्न निवडणूक त्या त्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देऊन आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करणार आहे. यावेळी या मोहिमेत टाटा सॉल्ट, शिक्षक, पोलीस, अभिनेते आणि व्यावसायिकांची ज्युरी म्हणून निवड करेल.

हे ही वाचा:

मंत्रिमंडळाचा विस्तार फार लवकर होईल असं वाटत नाही, अंबादास दानवे

पुण्यामध्ये सापडले एकाच कुटुंबातील ७ जणांचे मृतदेह ,आत्महत्या नसून हत्याच असल्याचे उघड

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version