spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

ती जुनी गोष्ट झाली, बृजभूषण सिंग वरमले?

माझा राज ठाकरेंना विरोध नाही, मी जी भूमिका घेतली ती गोष्ट जुनी झाली", असं वक्तव्य केलं. त्यामुळे बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर अचानक मावळ का झाले आहेत? याआधी त्यांनी राज ठाकरे यांना जो विरोधात केला होता तो आता होणार नाही का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील खासदार बृजभूषण सिंग हे महाराष्ट्र केसरी स्पर्धांसाठी महाराष्ट्रामध्ये आले आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. यावेळी त्यांनी पुण्यातून मीडियाशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्या विषयी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. बृजभूषण सिंग यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अयोध्यात येण्यापासून बंदी घातली होती. मात्र आज त्यांनी पुनमध्ये असताना,”माझा राज ठाकरेंना विरोध नाही, मी जी भूमिका घेतली ती गोष्ट जुनी झाली”, असं वक्तव्य केलं. त्यामुळे बृजभूषण सिंग यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवर अचानक मावळ का झाले आहेत? याआधी त्यांनी राज ठाकरे यांना जो विरोधात केला होता तो आता होणार नाही का? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

महाराष्ट्रातील पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून त्या स्पर्धेचा अंतिम विजेता आज ठरणार आहे. बृजभूषण सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते यासाठी महाराष्ट्रात आले आहेत. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी बोलताना ते म्हणाले,” महाराष्ट्र से मुझे हमेशा प्यार मिलता आ रहा है. इसलिए मै यहाँ की जनता का आभारी हूँ,” अशा शब्दात बृजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली.

पुण्यात सुरु असलेल्या महाराष्ट्र केसरी दोन गटातील होणाऱ्या अंतिम लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. मॅट विभागामधून नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर या दोघांमध्ये सामना होणार असून माती विभागात सोलापुरचा सिकंदर शेख आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड या दोघांमध्ये अंतिम लढत होणार आहे.

या अंतिम सामन्यांसाठी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रृजभूषण सिंह यांचं नुकतंच पुण्यात आगमन झाल आहे. पुण्यातील आज या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. संध्याकाळी होणाऱ्या अंतिम लढतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार हे मान्यवर देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनांमुळे ब्रृजभूषण सिंह यांनी त्यांना आव्हान दिलं होतं. मे २०२२ मध्ये राज ठाकरे यांनी आयोजित केलेला अयोध्या दौरा होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे राज ठाकरेंना हा दौरा रद्द करावा लागला होता. मात्र, आज बृजभूषण यांनी केलेल्या विधानामुळे अनेक चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. तसेच आता राज ठाकरे यांना अयोध्या दौराला विरोध होणार नाही का?, असा सवाल उपस्थित होत आहे.

हे ही वाचा:

भारत जोडोला तात्पुरती स्थगिती, बड्या नेत्याच्या मुत्यूने काँग्रेसमध्ये व्यक्त केली हळहळ

काहीतरी वेगळं शिजतंय, अजित पवारांनी आधीच दिला होता इशारा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss