Darshana Pawar हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस अखेर अटक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हिच्या मृत्यू प्रकरणाला अनेक नवनवीन वळण येत होती.

Darshana Pawar हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीस अखेर अटक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून अधिकारी झालेली तरुणी दर्शना पवार हिच्या मृत्यू प्रकरणाला अनेक नवनवीन वळण येत होती. अश्यातच या हत्याकांड प्रकरणात मोठी बातमी माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपीस अटक करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे ग्रामीण पोलीस मुख्य आरोपी राहुल हंडोरे याचा शोध घेत होते. अखेरी त्याला अटक झाली आहे. राहुल याला मुंबईतून अटक झाली आहे.

MPSC परीक्षेमध्ये राज्यात तिसरी आलेली तरुणी दर्शना पवार हिचा संशयस्पद मृत्यू झाला. दर्शना ही २६ वर्षीय तरुणी होती. दर्शनाचा मृतदेह हा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार या तरुणीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते.

दर्शना पवार आणि तिचा एक मित्र ट्रेकिंगला गेले. परंतु तेथून दर्शना काही घरी परतली नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती. आणि अचानक राजगडाच्या पायथ्याची या तरुणीचा मृतदेह सापडला. दर्शना ही २६ वर्षीय तरुणी होती. दर्शनाचा मृतदेह हा राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. हा मृतदेह अचानक सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ ही उडाली होती. तसेच दर्शना सोबत असलेल्या मित्राचे नाव राहुल हांडोरे आहे. हा मित्र हत्या झाल्यापासून फरार होता. अखेर आता त्या मुलाला आता पकडण्यात आलं आहे.

हत्येचे नेमकं कारण काय ?

दर्शना आणि राहुल हे दोघेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. राहुलची दर्शनासोबत लग्न करण्याची राहुलची इच्छा होती. दोघेही एमपीएससीची परिक्षा देत होते. दोघांपैकी दर्शना आधी एमपीएससी उत्तार्ण झाली. तिने वन विभागाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळे वन अधिकारी बनण्याची फक्त औपचारिकताच उरली होती. त्यानंतर दर्शनाच्या घरच्यांनी तिचे लग्न दुसर्‍या मुलासोबत जमवले आणि लग्नाच्या हालचाली सुरु केल्या. त्यामुळे राहुल हंडोरे अस्वस्थ होता. त्याने त्याला एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी थोडा वेळ द्यावा, असा आग्रह धरला. तो देखील परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनेल, असे दर्शना आणि तिच्या कुटुंबियांना सांगून पाहिले. मात्र त्याला प्रतिसाद मिळत नसल्याने राहुलने राजगडाच्या पायथ्याशी दर्शनाची हत्या केली.

हे ही वाचा:

घरच्या घरी Healthy oats आणि Honey पासून बनवा टेस्टी कुकीज…

शिवसेनाही अभेद्य राहावी ही मनापासून इच्छा, छगन भुजबळ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version