spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुण्यातील कोयता गँगचा प्रमुख आरोपी अटकेत

पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंगचा धुडगूस हा सुरु होता. परंतु आता पुणे पोलिसांनी कोयता गॅंगच्या (koyta gang) विरोधात मोठी (Crime News) कारवाई केली आहे.

पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कोयता गॅंगचा धुडगूस हा सुरु होता. परंतु आता पुणे पोलिसांनी कोयता गॅंगच्या (koyta gang) विरोधात मोठी (Crime News) कारवाई केली आहे. त्यामध्ये कोयता गॅंगचा प्रमुख बिट्टया कुचेकर, साहिल शेख आणि आकाश कांबळे यांना अखेर अटक केली आहे. या गॅंगने पुणे शहरात अनेक दिवांपासून धुडगूस हा घातला होता.

कोयता गॅंगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. यावेळी त्यांच्याकडून २ कोयते जप्त करण्यात आले आहेत. आतापर्यंतची कोयता गॅंगच्या विरोधातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. युनिट -6 ने ही कारवाई केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील हॉटेल, लॉज, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील हॉटेल, लॉज, एसटी बसस्थानक, रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबवली होती. पुण्यातील पोलिसांनी (Pune Police) कोंबिंग ऑपरेशन करत ही सर्व कारवाई केली. कोम्बिंग ऑपरेशनच्या पहिल्या रात्री धाडसत्र सुरु केलं होतं. पोलिसांनी (Pune Police) कोंबिंग ऑपरेशन राबवलं. आणि पुणे शहरातील ३,७६५ गुन्हेगारांची चौकशी केली. पोलिसांनी मध्यरात्री विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांची चौकशी केली. तपासात ६९८ गुन्हेगार एकाच पत्त्यावर राहत असल्याचे निष्पन्न झालं. त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, १४५ कोयते जप्त करण्यात आले. मागील काही दिवसांपासून पुण्यात कोयता गॅंगने धुमाकूळ घातला होता. शहरातील विविध भागात त्यांनी दहशत निर्माण केली होती.

कोयता गॅंगचे हे सगळे रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत होते. परंतु त्या दरम्यान पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तिघांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोयता गॅंगविरोधात पुणे पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. त्यांचं धाडसत्र सुरुच आहे. मागील दोन दिवस पुणे पोलीस कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे. त्यात रात्रभर पोलीस शहरातील विविध भागाची झाडाझडती करत आहेत. काल दि ११ जानेवारी रोजी रात्रभरात ३२ जणांवर गुन्हे दाखल केले आणि त्यांच्याकडून 38 कोयते जप्त केले.

हे ही वाचा:

… तर आंबेडकर कोणासोबतच युती करू शकणार नाहीत, शिंदे गटाची प्रतिक्रिया

चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा गौप्यस्फोट, अमित देशमुख भाजपात प्रवेश करणार ?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss