स्पोर्ट्स बाईकचे सुटले नियंत्रण, नाहक गेला आजोबाचा-नातवाचा जीव

पुरंदर तालुक्यातील पुणे-पंढरपूर मार्गावर दिवे येथे दोन दुचाकी स्वरांची धडक झाली आणि त्यामध्ये आजोबा आणि नातवाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. गोकुळ धोंडीबा झेंडे( वय ६३) आणि पद्मनाभ झेंडे( वय ४) असं या मृत व्यक्तीची नावे आहेत.

स्पोर्ट्स बाईकचे सुटले नियंत्रण, नाहक गेला आजोबाचा-नातवाचा जीव

महाराष्ट्राची सध्या विकासाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यासाठी राज्यातील अनेक भागांना जोडण्यासाठी महामार्ग बनवले जातात. परंतु महाराष्ट्रात महामार्गांवर होणारे अपघाताचे प्रमाण देखील वाढत चालल्याचे दिसून येते. दररोज एक तरी अपघाताची बातमी मिळते. त्याचप्रमाणे ४ जानेवारी २०२४ रोजी देखील पुरंदर तालुक्यातील पुणे-पंढरपूर मार्गावर दिवे येथे दोन दुचाकी स्वरांची धडक झाली आणि त्यामध्ये आजोबा आणि नातवाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. गोकुळ धोंडीबा झेंडे( वय ६३) आणि पद्मनाभ झेंडे( वय ४) असं या मृत व्यक्तीची नावे आहेत.

गोकुळ झेंडे हे ४ जानेवारी रोजी संध्याकाळी आपल्या नातवाला त्यांच्या दुचाकीवरून शाळेतून घरी घेऊन जात होते. त्याचवेळी स्पोर्ट्स बाईकने त्यांना धडक दिली, आणि हा अपघात झाला. यामध्ये गोकुळ झेंडे आणि पद्मनाभ झेंडे गंभीररीत्या जखमी झाले, आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. गोकुळ झेंडे यांचा नातू पद्मनाभ हा जागीच मृत्युमुखी पडला तर गोकुळ झेंडे यांना उपचारासाठी दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

गोकुळ झेंडे यांच्या दुचाकीला धडक देणारी एक स्पोर्ट्स बाईक होती. त्यामुळे तिचा स्पीड जास्त होता. त्यामध्येच चालकाचे बाईक वरील नियंत्रण सुटले आणि त्याने मागून येऊन गोकुळ यांच्या दुचाकीला धाड दिली. ही धडक एवढी जोरदार होती कि, दुचाकीवरील दोघांना गंभीर जखम होऊन मृत्यू झाला. स्पोर्ट्स बाईक चालवणाऱ्या दुचाकीस्वाराचे नाव यशवर्धन मगदूम असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे दिवे परिसर संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. त्याच संतापाच्या भरात नागरिकांनी यशवर्धन मगदूम याची स्पोर्ट्स बाईक जाळून टाकली. नंतर पोलिसांनी नागरिकांना शांत करून तणाव कमी करण्याचा प्रयन्त केला. या प्रकरणाAचा तपस हडपसर पोलीस करत आहेत.

एकाच वेळी गोकुळ झेंडे आणि पद्मनाभ झेंडे या आजोबा नातवाचा मृत्यू झाल्यामुळे झेंडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच दिवे गाव परिसरात देखील शोककळा पसरली आहे. त्यामुळे महामार्गाच्या परिसरातील व्यवसायिकांनी दुकाने बंद ठेवली आहेत. या अपघातामुळे पुन्हा एकदा पुणे-पंढपूर मागार्वर होणाऱ्या अपघाताचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या आधीही या महामार्गावर अनेक अपघात होऊन अनेक निष्पाप जीवांना आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे.

हे ही वाचा:

राजकारण करण्यासाठी आले आहात की राज्याच्या विकासासाठी? योगी आदित्यनाथ यांच्या रोड शो वर राऊतांच्या सवाल

धनंजय मुंडेंच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट!, बरगड्यांना फ्रॅक्चर तर डोक्याला किरकोळ जखमा, पण प्रकृती स्थिर

Yogi Adityanath यांचं उत्तर प्रदेश विकासावर भाष्य, उत्तर प्रदेशचे आहोत हे सांगायला संकोच व्हायचा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version