सर्व गडकोट किल्ल्यांवर संवर्धन करण्याचे काम राज्य सरकार करेल, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिम्मित (Chhatrapati Shivaji Maharaj's birth anniversary) राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. तसेच शिवनेरीवर देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ती शिवजयंती सोहळा हा संपन्न झालं आहे.

सर्व गडकोट किल्ल्यांवर संवर्धन करण्याचे काम राज्य सरकार करेल, मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिम्मित (Chhatrapati Shivaji Maharaj’s birth anniversary) राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येत आहे. तसेच शिवनेरीवर देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ती शिवजयंती सोहळा हा संपन्न झालं आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी जनेतील संबोधित केले. यावेळी छत्रपती शिवरायांचा मावळा राज्याचा मुख्यमंत्री झाला असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde)संभाजी महाराजांना उद्देशून म्हणत आहेत की, आमचे सरकार सर्व सामान्यांचे सरकार आहे. या राज्य सरकारने सगळे निर्णय राज्यातील लोकांच्या हिताचे, कष्टकऱ्यांच्या हिताचे घेतले आहेत. सर्व प्रश्नांना न्याय देण्याचे काम सरकारने केल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मुख्यमंत्रींनी जनतेला शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या

शिवनेरी (shivneri) गडावर राज्याच्या पर्यटन विभागाने महोत्सवाचे आयोजन केलं गेलं आहे. अवघा परिसर भगव्या रंगात मिसळला आहे. भगवा समुद्र आहे कि काय असा भास होतो. प्रत्येकाच्या मना मनामध्ये शिवराय आहेत . आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक आहोत असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संभाजीराजे छत्रपती आपण केलेल्या सर्व सुचनांची आम्ही दखल घेतली, कोणत्याही शिवभक्तांना शिवाजी महाराजांचे दर्शन घेण्यापासून रोखणार नाही असं देखील मुख्यमंत्री म्हणाले.

पुढे संभाजी छत्रपतींना (Sambhajiraje Chhatrapati) आश्वासक वक्तव्य करत एकनाथ शिंदे म्हणाले संभाजीराजे आपण केलेल्या सर्व सूचना जनतेसाठी फायदेशीर आहेत. त्या सर्व सुचनांची आम्ही दखल घेऊ. त्यामुळं आपण रायगडला जसा पुढाकार घेतला आहे, तशाच पद्धतीनं सर्व गडकोट किल्ल्यांवर संवर्धन करण्याचे काम राज्य सरकार करेल. संभाजीराजे आपण सूचना करा त्या सूचनांचा विचार करुन सरकार अंमलबजावणी करेल असे मुख्यमंत्री म्हणाले. वडूज तुळापूरसाठी कधीही निधी कमी पडणार नाही तसेच नियोजनात काही त्रुटी दूर केल्या जातील. प्रशासनाला तश्या सूचना देण्यात आल्या आहेत असे मुख्यमंत्री म्हणाले.आपण सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. गडकोट किल्ल्यांच्या बाबतीत जे जे आपल्याला करायचे आहे, ते ते आपण सोबत करूयात असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवरांयाचा ऐतिहासीक ठेवा जपण्याचे काम सरकार करेल. यामध्ये सरकार कुठेही कमी पडणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

हे ही वाचा :

शिंदे गटाचं ‘सोशल मीडिया स्ट्राईक’, प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण ठेवून व्यक्त केला आनंद

Uddhav Thackeray यांनी बोलावली तातडीची बैठक, काय असेल पुढील भूमिका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version