कोयता गॅंगची दहशत वाढली! मध्यरात्री पेट्रोल पंपावर दरोडा

कोयता गॅंगची दहशत वाढली! मध्यरात्री पेट्रोल पंपावर दरोडा

पुण्यामध्ये कोयता गॅंगची दहशत वाढताना दिसत आहे. या गॅंगने पुणे जिल्ह्यातील वेळू ग्रामपंचायत हद्दतील श्रीराम पेट्रोल पंपावर दरोडा टाकला आहे. चोरांनी कोयत्याने मारहाण करून २२ हजार रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहेत. शुक्रवारी २३ डिसेंबर रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पाच अनोळखी व्यक्ती हातात दोन ते अडीच फूट लांबीचे धारदार कोयते घेऊन उभे होते . ते दोन काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरुन आले. त्यानंतर त्यांनी सिक्युरिटी गार्डला कोयत्याच्या जोरावर आत आणले आणि पैशाची मागणी केली . त्या राक्षसी वृत्तीच्या माणसांनी शिवीगाळ करत तीन कामगारांना आणि सुरक्षा रक्षकाला कोयत्याने मारहाण केली. पेट्रोल पंपाच्या मालकाने या घटनेची पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भोर (bhor police station) पोलीस ठाण्यात पाच अनोळखी आरोपींविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

पुण्यात या गॅंगची दहशद वाढत चालली आहे. या दरोडे खोरानी बऱ्याच ठिकाणी दरोडे घातले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विधानसभेत कोयता गँगच्या दहशतीचा प्रश्न मांडला. या गुंडाना लवकरात लवकर अटक व्हावी ह्याची मागणी केली . हडपसर पोलिसांनी (hadapsar police) , २३ डिसेंबर २०२२ रोजी पुणे शहर पोलीस अधिकार्‍यांनी कोयता टोळीतील आणखी तीन जणांना भिवंडी आणि अहमदनगर येथून अटक केली आहे, जे हडपसर, पुणे जवळील मांजरी येथील रहिवाशांना दहशत माजवत होते. लवकरच ह्या गॅंग चा छडा लावण्यास पोलिसांना यश येईल

या कोयत्या गॅंगमुळे हडपसर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक व्यापारी आणि लहान भाजी विक्रेते या गँगमुळे धास्तावले आहेत. या संदर्भात अनेकदा व्यापाऱ्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. पोलीसही त्यांच्यावर कारवाई करण्याच्या तयारीत असतात, मात्र त्यांना पोलिसांचीही भीती उरली नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या गँगची दहशत वाढत आहे. व्यापारी म्हणतात, या कोयता गँगमुळे आम्हाला त्रास होत आहे, शिवाय त्यांच्या दहशतीमुळे लहान व्यापाऱ्यांवर आणि ग्राहकांवरदेखील मोठा परिणाम होत आहे. अनेक लोक या गँगमुळे धास्तावले आहे. लहान मुलांनाही या गँगकडून धमक्या येत आहेत. यामुळे मुलांसह पालकही धास्तावले आहेत. त्यामुळे या गँगचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापारी संघटनेकडून मागणी केली जात आहे.

हे ही वाचा:

दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीतही Rahul Gandhi दिसले हाफ टी-शर्टमध्ये, व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

ICICI बँक कर्ज प्रकरणात, वेणूगोपाल धूत यांना सीबीआयकडून अटक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version