spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

लाच घेणारे तीन पोलीस हवालदार निलंबित!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division) सोमवारी मध्यरात्री सापळा रचून लाच घेणारे पोलीस हवालदार दीक्षित यांना रंगेहाथ पकडले होते.

येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी १३ हजार रूपये लाच घेतल्या प्रकरणी तीन पोलीस हवालदारांवर (Police Constable) गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच संदर्भांत कारवाई करताना या तिन्ही हवालदारांचे निलंबन करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे (Shashikant Borate) यांनी दिले आहेत.

हवालदार राजेंद्र रामकृष्ण दीक्षित (Rajendra Ramakrishna Dixit), हवालदार जयराम नारायण सावळकर (Jairam Narayan Sawalkar), हवालदार विनायक मुधोळकर (Vinayak Mudholkar) अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. अपघाताची तक्रार दाखल करून घेण्यासाठी एका टुरिरस्ट (Tourist) व्यावसायिकाकडे या तिन्ही हवालदारांकडून तब्ब्ल तेरा हजार रुपयांच्या लाचेची (bribe) मागणी करण्यात आली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Division) सोमवारी मध्यरात्री सापळा रचून लाच घेणारे पोलीस हवालदार दीक्षित यांना रंगेहाथ पकडले होते. नंतर केलेल्या कारवाईमध्ये लाच घेण्यासाठी हवालदार सावळकर, मुधोळकर यांनी सहाय केल्याचे उघडकीस आले होते. यामुळेच अशोभनीय वर्तन करून पोलिस दलाची प्रतिमा मलीन करणे, तसेच बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेऊन तिन्ही हवालदारांना पोलीस दलातून कायमचे निलंबित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

मराठी कलाविश्वातील आघाडीची अभिनेत्री मेघा धाडे यांचा भाजपमध्ये प्रवेश

‘Adipurush’ चित्रपट करणार पहिल्याच दिवशी १०० कोटींची कमाई

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss