पुण्यात एकाच दिवशी चाकू हल्ल्याच्या दोन घटना, तीन व्यक्ती जखमी

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे.

पुण्यात एकाच दिवशी चाकू हल्ल्याच्या दोन घटना, तीन व्यक्ती जखमी

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी वाढली आहे.पुण्यामध्ये एकाच दिवशी चाकूच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. आईने मुलाला दागिन्यांसदर्भात विचारल्यानंतर मुलाने आईवर थेट चाकूने हल्ला केला. ही घटना पुण्यातील थेरगाव येथे घडली.तर दुसऱ्या घटनेमध्ये शिवीगाळ का केला?असे विचारल्यानंतर वडील आणि मुलावर चाकू हल्ला केला.ही घटना दत्तनगरमध्ये घडली आहे. या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यातील थेरगाव मध्ये आईने आपल्या मुलाला घरातील दागिने कोठे ठेवले, गहाण ठेवले की विकले? असा प्रश्न विचारल्यानंतर थेट मुलाने आईच्या पोटात चाकूने वार केला. या घटनेची आईने वाकड पोलीस (Wakad Police) ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच मुलगा ओंकार ईश्वर बामणे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आईने मुलाला दागिन्यांबद्दल विचारल्यानंतर मुलाने आईवर चाकूने वार केले. दागिने विकले की गहाण ठेवले, असं आईने मुलाला विचारलं त्यानंतर यासंदर्भात माहिती दे नाहीतर पोलिसांना बोलवेल, अशी आईने मुलाला धमकी दिली. धमकी दिल्यानंतर मुलाने आईवर थेट वार केला. मुलाने जन्मदात्या आईच्या डोक्यावर आणि हातावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

तर दुसऱ्या घटनेमध्ये शिवीगाळ का केली? याचा जाब विचारल्यानेएका व्यक्तीने थेट बापलेकांवर हल्ला केला आहे. या प्रकरणी संग्राम धुळूबा शिंदे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भारती विद्यापीठ पोलिसांकडून संग्रामला अटक करण्यात आली आहे. गौरव कुलथे आणि त्याचे वडिल नवनाथ कुलथे हे दोघे हा हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. हे तीनही व्यक्ती एकाच परिसरामध्ये राहत होते. दोन महिन्याआधी संग्रामने दारू पिऊन धिगाणा घातला होता. याचं गोष्टीचा राग मनात ठेवून हा वडिल आणि मुलावर हल्ला केला.

Exit mobile version