Vande Bharat Sleeper Train: पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुण्यातून धावणार; केंद्रीय उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संकेत

Vande Bharat Sleeper Train: पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन पुण्यातून धावणार; केंद्रीय उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे संकेत

Vande Bharat Sleeper Train: वंदे भारत ट्रेनला प्रवाशांनी सर्वत्र उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे आता देशात वंदे भारत सिटींग ट्रेननंतर, स्लीपर ट्रेनचेही आगमन होणार आहे. सध्या शंभरहून अधिक वंदे भारत ट्रेन देशात धावत आहेत. वंदे भारत ट्रेनचे मार्ग देशातील २८० हुन अधिक जिल्ह्यांना जोडत आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरसाठी हुबळी ते पुणे ही नवी वंदे भारत ट्रेन सुरू केली त्यानंतर कोल्हापूरकरांना पुण्याला जाण्याचा मार्ग सोपा झाला आणि त्याचबरोबर पुणेकरांना कोल्हापूरला पोहचण्याचा मार्गही सोपा झाला. देशातील पहिली वंदे भारत ट्रेन महाराष्ट्रात मुंबई-सोलापूर रेल्वे मार्गावर धावली. त्याचमुळे आता नवी वंदे भारत स्लीपर ट्रेन कोणत्या मार्गावरून धावेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेन ही महाराष्ट्रातूनच धावणार असल्याची जवळजवळ शक्यता आहे. त्यात महत्वाचे म्हणजे ही ट्रेन पुण्यातूनच धावणार असल्याचे संकेत केंद्रीय उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी दिले. कर्नाटकच्या बंगळुरू येथे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ट्रेनची तांत्रिक तपासणी व पाहणी करून फोटोही शेअर केले आहेत. मुंबईवरून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसला वंदे भारत स्लीपर ट्रेन ही पर्याय असेल असेही त्यांनी म्हटले आहे.

वंदे भारत स्लीपर ट्रेनचा फर्स्ट लुक समोर

देशात पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार झाली असून तिचे अनावरण बंगळुरू येथे करण्यात आलं. या ट्रेनचे ट्रायल सध्या दहा दिवस सुरु राहणार आहे. मुंबई ते दिल्ली या मार्गावर १६०kmph वेगाने धावणाऱ्या ट्रेनसाठीची तांत्रिक प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. त्यामुळेच ही वंदे भारत स्लीपर ट्रेन ही मुंबई ते दिल्ली या मार्गावरून धावणार असल्याचे स्पष्ट होत आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेन ही राजधानी एक्सप्रेसला पर्याय असणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून ट्रेनची पाहणी करताना ट्रेनचे फोटोजही शेअर केले आहेत.

हे ही वाचा:

Raj Thackeray Vision Worli: काळीपिवळी टॅक्सी बघितली की हे शहर म्हणजे ‘मुंबई’ हे कळायचं, पण आता…काय म्हणाले Raj Thackeray?

Raj Thackeray Vision Worli: तुम्ही महाराष्ट्राचे मालक ना? तरीही तुम्हाला त्रास कसा दिला जाऊ शकतो?, वरळीत Raj Thackeray कडाडले

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version