spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धक्कादायक! सख्ख्या बहिणींनीच दिली वनराज आंदेकरची सुपारी; ‘तुला पोर बोलवून ठोकणार’ म्हणत दिली होती धमकी

Pune Crime News: पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) यांची काल (रविवार, १ सप्टेंबर) गोळ्या झाडून तसेच कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. या घटनेने पुणे हादरले गेले असून आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. वनराज आंदेकरच्या बहिणींच्या सांगण्यानुसार हि हत्या झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वनराज आंदेकरचे वडील आणि आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याने हि माहिती पोलिसांना दिली असून वनराज आंदेकरच्या हत्येचा कट बहिणींच्या सांगण्यावरून मेहुण्याने रचला असल्याचे म्हंटले आहे. त्यामुळे कौटुंबिक वादातून हि हत्या झाल्याचे पोलिसात निष्पन्न झाले आहे. वर्चस्ववादातून बहिणी आणि मेहुण्यांनीच हा खुनाचा कट रचल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादीचे नगरसेवक वनराज आंदेकर यांची काल पुण्यातील नाना पेठ परिसरात हत्या करण्यात आली. ५ ते ६ बाईकवरून आलेल्या १० ते १२ जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर गोळीबार करात तसेच कोयत्याने वार करत त्यांची हत्या केली. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून आतापर्यंत १० आरोपी निष्पन्न झाले आहेत.

सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा साविस्तर माहिती देत सांगितले कि,”वनराज आंदेकरच्या दोन सख्ख्या बहिणींना पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. गुंड सोमनाथ गायकवाडच्या मदतीने बहिणींनीच भावाचा काटा काढला. वनराज आंदेकरच्या हत्येच्या वेळी गॅलरीत बसून बहिणींनी ‘मारा-मारा’ अशा सूचना दिल्या. पुणे पोलिसांनी दोन बहिणी व त्यांच्या नवऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. संजीवनी कोमकर, कल्याणी कोमकर, गणेश कोमकर, जयंत कोमकर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे असून कौटुंबिक वादातून हत्या झालेली आहे. पुढील तपास पोलिसांकडून चालू आहे,” असे ते म्हणाले.

तुला पोर बोलवून ठोकणार, बहिणीने दिली होती धमकी

गणेश कोमकर हा आंदेकर यांचा जावई असून त्याला नाना पेठेतील एक दुकान दिले होते. पुणे महापालिकेकडून करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडण्यात आले. त्यानंतर कुटुंबात वादाला सुरुवात झाली. आंदेकर कुटुंबाच्या आशीर्वादानेच गणेश कोमकर याने स्वतःची गॅंग तयार केली होती. एका भांडणात मध्यस्थी करत भांडण मिटवल्याच्या रागातून तसेच दुकान अतिक्रमणातून पडायला लावल्याचा रागातून बहिणीने वनराज याला धमकी दिली होती. त्यातूनच त्याच्यावर हल्ला होऊन त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:

नेहरूंपर्यंत का जाता? माफी तुम्ही, BJP ने मागायला हवी.. Devendra Fadnvis यांच्या वक्तव्यावर Ambadas Danve आक्रमक

महाराजांबद्दल शंका का निर्माण करता? एवढा राग का व कश्यासाठी? सुरत लुटीबद्दलच्या Devendra Fadnavis यांच्या वक्तव्यावर Jitendra Awhad आक्रमक

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss