spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

वसंत मोरेंचं नाराजी नाट्य सुरूच? राज ठाकरेंच्या कार्यक्रमात उभं राहून ऐकावं लागलं भाषण

काही दिवसांपासून मनसेमध्ये मोठ्या प्रमाणत नाराजी नाट्य दिसून येत आहे. पुण्यातले मनसेचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे वसंत मोरे अनेक दिवसांपासून आपली नाराजी प्रसारमाध्यमांशी आणि सोशल मीडियावर बोलून दाखवली आहे. सध्या महाराष्ट्र नवनिर्माणसेना अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत.

दिनांक २ जानेवारी रोजी जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या वाढदिवसानिमित्त ‘अशोक पर्व’ या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील प्रसिद्ध अश्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम होता. त्यापूर्वी राज ठाकरे पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रमात उपस्थित होते. सगळे कार्यक्रम आटपून राज ठाकरे हे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात पोहोचले. नाट्यगृहात जाण्यापूर्वी त्यांनी पक्षाच्या एका उपक्रमाचं नाट्यगृहाबाहेर उद्घाटन केलं. त्यानंतर ते नाट्यगृहात अशोक पर्व या कार्यक्रमासाठी गेले. राज ठाकरे या कार्यक्रमातील वक्ते असल्याने मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणावर हजेरी लावली. त्यासोबतच अनेक पुणेकरदेखील अशोकपर्व कार्यक्रम बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजर होते. त्यावेळी नाट्यगृहात मोठी गर्दी सुद्धा झाल्याचं दिसून आलं. यावेळी अशोक सराफांच्या चाहत्यांना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण ऐकायला आलेल्या अनेक लोकांना उभ्याने कार्यक्रम बघावा लागला. या सगळ्यांमध्ये वसंत मोरे यांना देखील हा कार्यक्रम उभ्याने बघावा लागला. या कार्यक्रमात मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते पण एकाने सुद्धा वसंत मोरे यांना बसण्यासाठी जागा दिली नाही.

वसंत मोरे यांच्यामुळे पक्षाची बदनामी होत आहे. त्यामुळे वसंत मोरे यांच्याबद्दल भूमिका पक्ष दोन दिवसात घेणार, अशी माहिती मनसे नेते बाबू वागस्कर यांनी दिली होती. निलेश माझिरे यांची हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यासोबत चारशे जणांनी मनसे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पुण्यात मनसे नेत्यांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत वसंत मोरे यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं.

हे ही वाचा:

IND vs SL ‘सूर्यकुमार यादवने अनुभवी फलंदाजाप्रमाणे फलंदाजी केली’ माजी भारतीय खेळाडूची केले कौतुक

चेतन शर्मा पुन्हा निवड समितीचे अध्यक्ष, ‘या’ माजी क्रिकेटपटूंच्या नावांवर BCCIचा शिक्कामोर्तब

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss