पुण्यात नेमकं काय चालू आहे? कुत्र्याचे हात पाय बांधून पोत्यात…

पुण्यात (Pune) सध्या नवनवीन प्रकार घडत आहेत. भर रस्त्यात चाकूने वार, हत्त्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. एका भटक्या कुत्र्याचे पाय आणि तोंड बांधून त्याला पोत्यात भरून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली.

पुण्यात नेमकं काय चालू आहे? कुत्र्याचे हात पाय बांधून पोत्यात…

पुण्यात (Pune) सध्या नवनवीन प्रकार घडत आहेत. भर रस्त्यात चाकूने वार, हत्त्या होण्याचे प्रमाण वाढले आहे. एका भटक्या कुत्र्याचे पाय आणि तोंड बांधून त्याला पोत्यात भरून ठेवल्याची धक्कादायक घटना घडली. हा सर्व प्रकार पुण्यातील पिंपरी चिंचवड लगतच्या देहूरोड परिसरात घडला आहे. त्यातील तीन भटक्या कुत्र्यांचा अजूनही शोध लागलेला नाही. घडलेली ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

३ सप्टेंबर रोजी सध्यांकाळी देहूरोडच्या संकल्प नगरी सोसायटीत हा सर्व प्रकार घडला आहे. या सोसायटीमध्ये नेहमी भटक्या कुत्र्यांचा वावर असतो. त्यामुळे रहिवासी त्रासले होते. या कुत्र्यांपासून सुटका मिळ्वण्यासाठी हा सर्व प्रकार केल्याचे सांगितले जात आहे. ३ सप्टेंबरच्या संध्याकाळी तीन कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून त्यांना पोत्यात भरण्यात आले. हा सर्व प्रकार मोबाईल मधील कॅमेरामध्ये कैद झाला आहे. घडलेल्या या सर्व घटनेची माहिती प्राणी मित्रांना देण्यात आली. त्यानंतर लगेच प्राणी मित्रांनी देहू परिसरात धाव घेतली, तो पर्यंत त्या कुत्र्यांना दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले. प्राणी मित्रांनी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पण अजूनही त्यातील तीन कुत्र्याचा शोध लागला नाही.

पुण्यात काही दिवसांपूर्वी एका भटक्या कुत्र्याला मारहाण करून विष देऊन मारण्यात आले. या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर खान यांनी ढव्यातील अतूर व्हिला विस्टा सोसायटीच्या सुरक्षारक्षक आणि इतर तीन लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सकाळी ११ वाजता त्या कुत्र्याच्या रडण्याच्या आवाज ऐकून तात्विरत सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. कुत्र्याने सोसायटीत येऊ नये म्हणून हा सर्व प्रकार घडवून आणण्यात आला होता. कुत्र्याला मारहाण करू नका असे सांगितल्यावर देखील त्याला मारण्यात आले. मारल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

हे ही वाचा: 

Exit mobile version