यंदा पुणेकरांची दिवाळी पाण्यात ?

यंदा पुणेकरांची दिवाळी पाण्यात ?

पुण्यात १९ ऑक्टोबरपर्यंत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो अशी शक्यता हवामान तज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या दिवाळीच्या खरेदीचे नियोजन विस्कळीत होऊ शकते. ह्या वर्षी पुणेकरांची दिवाळी काही प्रमाणात पावसात जाण्याची शक्यता आहे.हवामान तज्ञांच्या म्हणण्या नुसार पुण्यात १९ ऑक्टोबरपर्यंत वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो त्यामुळे पुणेकरांच्या दिवाळीच्या खरेदीचे नियोजन विस्कळीत होऊ शकते .

दोन वर्षांनी निर्बंधमुक्त दिवाळी साजरी होणार असल्याने सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे,या वर्षी २१ ऑक्टोबरपासून संपूर्ण भारतात पाच दिवसीय दिवाळी साजरी होणार आहे.त्यामुळे पुणेकरांच्या घरात दिवाळीच्या तयारीची आणि खरेदीची लगबग सुरु आहे. मात्र १७ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर दरम्यान पुण्यात गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे.

दोन दिवसापूर्वी पुण्यात पोरं तास पडलेल्या पावसामुळे पुण्यातीळ काही भाग पाण्यात गेला होता व रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले होते .म्हणुन पुणेकरांना सतर्क राहण्याची गरज आहे.राज्यभरातील अनेक शहरात परतीच्या पावसाने जोर धरला आहे. पुणे, मुंबई, पालघर, नागपूर, ठाणे या शहरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळी पावसात साजरी करावी लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा :

‘साई रिसॉर्ट’ च्या मालकाला तूर्तास दिलासा; हायकोर्टानं कारवाई करण्यापूर्वी रितसर नोटीस बजावण्याचे निर्देश दिले

आ. संतोष बांगर यांच्या वर्तणुकीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वैतागले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version