अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी Radhakrishna Vikhe-Patil यांचे निर्देश, म्हणाले…

अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी Radhakrishna Vikhe-Patil यांचे निर्देश, म्हणाले…

सह्याद्री अतिथीगृहात दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्राच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. राज्‍यातील अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमुल उद्योग समुहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त २० लाख लिटर दूधाचे संकलन करावे, असे आवाहन दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण  विखे पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी केले आहे. या प्रक्रिया केंद्रानी सहकार्य केल्‍यास राज्‍यातील दूध उत्‍पादकांना ३५ रुपये भाव देणे शक्‍य होईल असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला. राज्‍य सरकारने दूधाच्‍या दरासंदर्भात घेतलेला निर्णय राज्‍यात तातडीने लागू करता यावा, यासाठी राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री विखे पाटील यांनी विशेष प्रयत्‍न  सुरु केले आहेत. त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने राज्‍यासह बाहेरच्‍या राज्‍यात जाणा-या दूधाला सुध्‍दा शासनाने लागू केलेले दर मिळावेत, यासाठी मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत 

मंत्री विखे पाटील यांनी या सर्व प्रतिनिधींशी संवाद साधताना दूध उत्‍पादक शेतक-यांना ३-५, ८-५ फॅटसाठी शासनाने ठरवून दिलेला ३५ रुपयांचा दर लागू करावा असे आवाहन केले. दर लागू करण्‍यासाठी काही अडचणी असल्‍यास विभागाकडून सोडविण्‍यासाठी निश्चित पुढाकार घेतला जाईल, अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली. ज्‍याप्रमाणे राज्‍यातील प्रक्रिया केंद्राना दूध पावडर उत्‍पादनासाठी दिले जाणारे अनुदान परराज्‍यातील प्रक्रिया केंद्रानाही मिळावे, अशी मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केल्‍यानंतर याबाबत सरकार सकारात्‍मकतेने विचार करेल, असे त्‍यांनी सांगितले.

सद्य परिस्थितीत राज्‍यात अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाल्‍याने यावर तोडगा काढण्‍यासाठी प्रक्रीया केंद्रानी २० लाख लिटर दूधाचे संकलन करण्‍यासाठी सहकार्य करावे, त्‍यामुळे शेतक-यांच्‍या दूधाचा प्रश्‍न  मार्गी लागला जाईल. यामुळे होणारे आर्थिक नुकसानही टळेल अशी अपेक्षा व्‍यक्‍त करतानाच दूधाला हमीभाव मिळावा, यासाठी राज्‍य  सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्‍ताव पाठविला असून,केंद्र सहकार मंत्री अमीत शाह यांची आपण  व्‍यक्तिगत भेट घेवून याबाबत लवकरच धोरणात्‍मक निर्णय घेण्‍याची विनंती  केली असल्‍याचे विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले. राज्‍यातील दूध उत्‍पादक शेतक-यांच्‍या हितासाठी सरकार आतिशय संवेदनशिल असून, दूधाला जास्‍तीत जास्‍त भाव देण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न केले जात आहेत. दूध उत्‍पादक शेतक-यांच्‍या प्रश्‍नासाठी सर्व पातळीवर उपाय योजना करण्‍याचे काम सुरु असल्‍याचे दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री विखे पाटील म्हणाले.

हे ही वाचा:

CM Shinde मुंबईकडे पैसे काढण्याचं यंत्र म्हणून पाहतात, पण आमच्यासाठी आमची Mumbai…Aaditya Thackeray यांचा सरकारवर निशाणा

Navi Mumbai NH 3: ॲक्सेस कंट्रोल मार्गामुळे शहरातून बाहेर पडण्यासाठी लागणार फक्त १५ मिनिटे, शहरांतर्गत वाहतूक आता होणार बंद

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version