चंद्रपूरमध्ये रेल्वे ब्रिज कोसळून मोठी दुर्घटना, २० प्रवासी जखमी

चंद्रपूरमध्ये रेल्वे ब्रिज कोसळून मोठी दुर्घटना, २० प्रवासी जखमी

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. चंद्रपूर रेल्वेस्थानकावर मोठी दुर्घटना घडली. बल्लारशाह ओवर ब्रीजचा एक भाग कोसळला. यात प्रवास करणारे प्रवासी ६० फूटांवरून खाली कोसळले. या दुर्घटनेत सुमारे २० प्रवासी जखमी झाले आहेत. ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातं. या स्थानकवरील पादचारी पूलाचा काही भाग अचानक कोसळला.

चंद्रपूरच्या बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पादचारी पूल बांधण्यात आला आहे. या पूलाचा एक मोठा भाग अचानक रविवारी संध्याकाळच्या सुमारास कोसळला. यावेळी पूलावर मोठ्या प्रमाणात नागरिक होते. या पूलाचा काही भाग अचानक कोसळल्याने १० नागरिक खाली रेल्वे ट्रॅकवर कोसळले. हा पूल तब्बल ६० फूट उंच आहे. या घटनेत ८ जणांची प्रकृती ही गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. अपघातानंतर सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. सध्या या दुर्घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारच्या सुमारास रेल्वे स्थानकातील फूट ओवर ब्रिजचा काही भाग अचानक कोसळला. रेल्वे प्रवाशांची ये-जा सुरू असताना ही दुर्घटना घडली. फूट ओवर ब्रिजचा स्लॅब कोसळल्याने काही प्रवासी थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळले. सुदैवाने ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी रेल्वे ट्रॅकवरुन कोणतीही ट्रेन जात नव्हती. अन्थथा मोठी दुर्घटना घडली असती. हा फूट ओवर ब्रिज नेमका किती वर्षे जुना होता? त्याची देखभाल व्यवस्थित होत होती की नाही? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. तसेच हा स्लॅब नेमका कशामुळे कोसळला याबाबतही अद्याप अधिक माहिती उपलब्ध झालेली नाहीये.

हे ही वाचा : 

राज ठाकरेंचा राहुलगांधींवर खरपुस शब्दांत टीका

वय काय, बोलतोय काय, काय चाललंय? राज ठाकरेंचा राज्यपालांवर घणाघात

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version