spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

दिवाळीत रेल्वेचा झटका, प्लॅटफॉर्म तिकीट पाच पटीने वाढलं! प्लॅटफॉर्मवर जावं की जाऊ नये?

ऐन दिवाळीच्या उत्सवात मध्य रेल्वेने (Central railway) मुंबईकरांना (mumbaikar) झटका दिला आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह (csmt) ६ रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचे तिकीट चारपटीने वाढवले आहे.

ऐन दिवाळीच्या उत्सवात मध्य रेल्वेने (Central railway) मुंबईकरांना (mumbaikar) झटका दिला आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह (csmt) ६ रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मचे तिकीट चारपटीने वाढवले आहे. या सहाही रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मचे तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये करण्यात आलं आहे. त्यामुळे प्रवाशांनो, या स्थानकातील प्लॅटफॉर्मवर जाताना खिसा पाहूनच जा. नाही तर माघारी परतावं लागेल.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या काही रेल्वे स्टेशनवर आता प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये करण्यात आलं आहे. याआधी हे शुल्क १० रुपये होतं. मात्र आता हे पाचपट वाढवण्यात आलं आहे. रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑक्टोबरपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला आहे. मुंबई सेंट्रल, दादर, बोरीवली, वांद्रे टर्मिनस, वापी, वलसाड, उढना, सुरत या स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म तिकीटांच्या दरात वाढ झाली आहे..

 मोठ्या प्रमाणावर चाकरमानी आपल्या गावी परतत असल्याने अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. पुणे मुंबईकडून सातारा कोल्हापूरकडे जाणाऱ्या महामार्गांवरची वाहतूक खोळंबली आहे. तर दुसरीकडे पुणे मुंबईदरम्यानच्या वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.

यापूर्वी दक्षिण रेल्वेनेही प्लॅटफॉर्मच्या तिकिटात वाढ केली आहे. चेन्नई मंडळाच्या आठ प्रमुख रेल्वे स्थानकात ही वाढ करण्यात आली आहे. चेन्नई सेंट्रल, चेन्नई एगमोर, तांबरम, काटपाडी, चैंगलपट्टू, अरक्कोनम, तिरुवल्लूर आणि अवाडी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटात वाढ करण्यात आली आहे. ही तिकीट १ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी २०२३ पर्यंत असणार आहे.

हे ही वाचा:

भरत गोगवलेचे कट्टर विरोधक काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप पोहचल्या मातोश्रीवर

India Vs Pakistan Live Streaming : T20 World Cup चा ‘महामुकाबाला’ कधी आणि कसा पाहायचा?, जाणून घ्या सविस्तर

टी-२० विश्वचषका आधी रोहित शर्माने घेतली पत्रकार परिषद; बी.सी.सी.आय विरुद्ध पी.सी.बी वादविवादावर त्याच्या पहिल्या प्रतिक्रियेत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss