मुंबई-उपनगरात पाऊस सुरूच, लोकल सेवेवर परिणाम

मुंबई-उपनगरात पाऊस सुरूच, लोकल सेवेवर परिणाम

गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात पावसाची रिपरिप सुरूच आहे. आकाशात काळे ढग दाटून आले. त्यामुळे अंधार दाटून आला होता. त्यानंतर राज्यातील काही जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. आकाशातील काळ्या ढगांची गर्दी पाहता पावसाचा जोर आणखी काही काळ कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघालेल्या चाकरमन्यांची तारांबळ उडाली. आज सकाळपासूनच मुंबईतील लोकल सेवेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. मध्यरेल्वे वरील बदलापूर येथून सीएसएमटीच्या दिशेने जाणारी ट्रेन धीम्यागतीने जात आहे.

हेही वाचा : 

लहान मुलांचे पोट बिघडल्यास त्यांना अन्न पचन होणारे कोणते पदार्थ द्याल ?

मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे चित्र आहे. त्याचा रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. त्याशिवाय मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल सेवेलाही पावसाचा फटका बसला आहे. लोकल सेवा उद्याप सुरू आहे ही प्रवाशांसाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक पाच-१० मिनिटे उशिराने सुरू आहे. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने सर्वच नागरिकांना आपल्या कामासाठी घरातून बाहेर निघताना पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडा, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! जाणून घेऊया ‘व्हिक्टोरिया’ चे रहस्य ..

मान्सून सक्रिय नसल्याने पावसामध्ये आलेल्या खंडानंतर गेल्या आठवड्यापासून राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रामध्ये मान्सून पुन्हा सक्रिय होत असून वाऱ्यांची क्षमता सध्या मध्यम ते तीव्र आहे. मान्सून ट्रफचा पूर्वेकडील भाग दक्षिण दिशेने सरकण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली. ४८ तासांमध्ये पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊ शकते. या प्रणालींमुळे राज्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढू शकतो, असे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.

‘बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती… ‘ मुख्यमंत्र्यांची जोरदार राजकीय टोलेबाजी

Exit mobile version