spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

देशभरातील काही भागात पावसाचा अंदाज

संपूर्ण देशभरात सर्वच राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.

संपूर्ण देशभरात सर्वच राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. १६ सप्टेंबर रोजी हवामान खात्याने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेशसाठी देखील हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. तिथेही पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिल्ली-एनसीआरमध्ये आज दिवसभर ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही भागात मध्यम आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत कमाल तापमान ३३ अंश आणि किमान तापमान २५ अंश असणं अपेक्षित आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस दिल्लीत ढगाळ वातावरण आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुण्याच्या घाट परिसरासह उत्तर महाराष्ट्रात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार तर अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या उर्वरित भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिकसह ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, पुणे, विदर्भातील वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या २४ तासापासून झालेल्या पावसामुळे वातावरणात खूप बदल झाला आहे. तर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या अनेक भागांत आज मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर उत्तराखंड मधील ५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस देशातील काही भागांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा: 

मुख्यमंत्री आजपासून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संभाजीनगर दौऱ्यावर

‘नमो एक्सप्रेस’ला देवेंद्र फडणवीसांनी दाखवला भगवा झेंडा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss