spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rain Update : मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस

राजधानी मुंबईसह उपनगरात आणि परिसरातील जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.

राजधानी मुंबईसह उपनगरात आणि परिसरातील जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई जिल्ह्यातही पावसामुळे नदी, नाले, बंधारे भरुन वाहत आहेत. तर, राज्यातील विविध जिल्ह्यात पावसामुळे धबधबे (Waterfall) ओसंडून वाहत आहे. त्यामुळे, पर्यटकांनीही या धबधब्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. तसेच कल्याण डोंबिवलीत मुसळधार पाऊस सुरु आहे. सकाळपासूनच पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचले आहे.

हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईकरांसाठी पुढचे ३६ तास महत्वाचे आहेत. कारण मुंबईत २०० मिमी पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागानं इशारा दिला आहे. हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मुसळधार पाऊस (Mumbai Heavy Rain) पडण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली, येथील ठिकठिकाणी रस्ते झालेत जलमय झाले आहेत. रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत होत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली,उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर परिसरात एक तासाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. कल्याण डोंबिवलीत काहीशी विश्रांती घेतलेल्यानंतर एक तासापासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. रात्री १० वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू असून अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत.

तर कल्याणच्या छत्रपती शिवाजी चौकात गुडघ्याभर पाणी साचले आहे. पावसामुळे कल्याण डोंबिवलीतील अनेक परिसरात वाहतूक कोंडी झाली असून पाण्यातून मार्ग काढत वाहन चालकाला प्रवास करावा लागत आहे. अधून मधून पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने पाण्याचा निचरा होताना दिसत आहे. मात्र पाण्याचा जोर कायम राहिला तर अनेक सकल भागत मोठ्या प्रमाणात पाणी शासनाची शक्यता आहे. कल्याण दुर्गाडी किल्ल्या जवळील दुर्गा माता चौकात पाणी साचले आहे. रहदारीचा रस्ता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. उल्हासनगरच्या मद्रासीपाडा परिसरात नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं आहे. गेल्या २ तासांपासून उल्हासनगर शहरात मुसळधार पाऊस सुरु आहे. घरात पाणी आल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली परिसरात चार तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. डोंबिवली पूर्वेकडील एम आय डी सी परिसरातील पोस्ट ऑफीसच्या आवारात गुडघाभर पाणी साचलं आहे.

Latest Posts

Don't Miss