Rain Updates: राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

Rain Updates: राज्याच्या विविध भागांत मुसळधार पावसाची शक्यता, नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

राज्यात सध्या उकाड्याचं वातावरण दिसून येत असलं तरीही पुढील चार ते पाच दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोमवारी म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मुंबई (Mumbai) प्रमाणे पालघर (Palghar), ठाणे (Thane) या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. २४ सप्टेंबर पासून ठाणे (Thane), पालघर (Palghar) जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वातावरणातील वाढलेली आद्रता तसेच मुंबईत पावसाचे प्रमाण कमी असल्याने मुंबईकर उकाड्याने हैराण झाले आहेत. मागच्या दोन दिवस कमाल तापमान जास्त होते. मात्र, आता पुढील आठवड्यामध्ये पावसानंतर तापमानात काही प्रमाणात घसरण होण्याची शक्यता असून उकाड्यापासून दिलासा मिळू शकेल.

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर (Mumbai City) आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज देण्यात आला आहे. शहर आणि उपनगरात हलका पाऊस तसेच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याच्या शक्यतेसह आकाश अशंतः ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०°C आणि २६°C च्या आसपास असेल. असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यांमध्ये पुढील चार ते पाच दिवसात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले  आहे. मराठवाड्यातील (Marathwada) विविध जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट  (Yellow Alert) जाहीर करण्यात आला होता. पालघर (Palghar) आणि ठाणे (Thane) जिल्ह्यामध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबईसह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच धुळे(Dhule), नाशिक (Nashik), नंदुरबार (Nandurbar)  जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भामध्ये भंडारा (Bhandara), अमरावती (Amravati), गोंदिया (Gondia), चंद्रपूर (Chandrapur) या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले आहे.

हे ही वाचा:

लोकशाही आणि लोकशक्तीला घाबरणारे हे डरपोक सरकार, मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकांवरून Sanjay Raut यांचा महायुती सरकारवर निशाणा

Raj Thackeray Vision Worli: Sandeep Deshpande हा राजकीयदृष्ट्या जागृत आणि अभ्यासू मुलगा, तो आमचा हिरा! ठाकरेंकडून देशपांडेंचे कौतुक

Follow Us
Exit mobile version