spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Rain Alert : राज्यभर मुसळधार पाऊस, तर पुढील ३ ते ४ तास मुंबईकरांसाठी सतर्कतेचे

सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात आठवडाभर चांगला पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने मोठा दणका दिला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच शेतकरी वर्गालाही मोठी फटका या पावसाचा बसला आहे.

सध्या संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. राज्यात आठवडाभर चांगला पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी या परतीच्या पावसाने मोठा दणका दिला आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच शेतकरी वर्गालाही मोठी फटका या पावसाचा बसला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडून महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत असल्यानं जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात म्हणजे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. वाहतूक मंदावणे, झाडांची पडझड होण्यासारख्या घटना घडण्याची शक्यता देखील आहे. दरम्यान, सकाळपासूनच मुंबईसह ठाणे परिसारत पावासाचा जोर वाढला आहे. रात्रभर पावसाची रिपरिप सुरु होती. त्यानंतर सकाळपासून पावसाचा जर वाढला आहे. आता पुढील तीन ते चार तास मुसळधार पावासाचा अंदाज वर्तवल्यानं मुंबईकरांना सतर्क राहावं लागणार आहे. सखल भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतूक मंद गतीनं सुरु आहे. दरम्यान, मुंबईच्या लोकल रेल्वे सेवेवर कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, वाहतूक संथ गतीनं सुरु आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार १६ आणि १७ सप्टेंबर म्हणजे आज आणि उद्या मुंबईसह उत्तर कोकणातील काही भाग आणि घाट परिसरातही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसेच उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या भागात देखील हवामान विभागानं पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढील तीन ते चार दिवस मान्सून सक्रीय राहील, अशी माहिती हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

 मुंबईसह पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावासाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन दिवसांत कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. रायगड आणि रत्नागिरीमध्ये शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र सिंधुदुर्गात शुक्रवारपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. तर नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. रामकुंडमध्ये अनेक मंदिर पाण्याखाली गेली आहेत. गंगापूर धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीतील पात्रामध्ये विसर्ग वाढवून सकाळी ९ वाजता १५ हजार २११ क्यूसेक करण्यात आला आहे, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

तसेच नाशिक, मुंबई पाठोपाठ पुणे शहराला देखील पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही चारही धरणे पूर्णपणे भरली आहेत. सध्या या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत आहे. तसेच, घाट माथ्यावर होणाऱ्या पावसामुळे पाण्याचा येवा वाढल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आज सकाळी त्यात वाढ करून १५ हजार २११ क्यूसेक करण्यात आला आहे. विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नदीपात्रालगतच्या शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

कोठडीत असलेल्या संजय राऊतांच्या ‘या’ वक्तव्यावरून सोशल मीडियावर चर्चा

जाणून घ्या आजच्या काळातील ओझोन थराचे महत्त्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss